आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामदा एकादशी उद्या : जाणून घ्या, या व्रताचे महत्त्व आणि संपूर्ण विधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. कामदा एकादशीला भगवान श्रीविष्णूचे उत्तम व्रत मानण्यात आले आहे. या वर्षी हे व्रत 17 एप्रिल रविवारी आहे. धर्म ग्रंथानुसार कामदा एकादशी व्रत पुण्याने सर्व पापातून मुक्ती मिळते. ही एकादशी कष्ट दूर करणारी आणि मनासारखे फळ प्राप्त करून देणारी असल्यामुळे शास्त्रामध्ये ही कामदा एकादशी नावाने ओळखली जाते. या एकादशीची कथा आणि महत्त्व भगवान श्रीकृष्णाने पांडुपुत्र धर्मराज युधिष्ठीरला सांगितले होते. कामदा एकादशीचा व्रत विधी खालीलप्रमाणे आहे...
व्रत विधी -
कामदा एकादशीच्या दिवशी स्नान करून पवित्र झाल्यानंतर संकल्प करून भगवान श्रीविष्णूचे पूजन करावे. श्रीहरिला फुल, फळ, तीळ, दुध, पंचामृत इ. पदार्थ अर्पण करावेत. दिवसभर उपवास करावा.
एकादशी व्रतामध्ये ब्राह्मणाला भोजन आणि दक्षिणा देण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे द्वादशी तिथी (1 एप्रिल, बुधवारी) ला ब्राह्मणाला जेवणासाठी आमंत्रित करून दक्षिणा देऊन तृप्त करावे. अशाप्रकारे कामदा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.