आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kamika Ekadashi Today: Know The Story Of The Fast, The Importance And Fast Method

कामिका एकादशी आज : जाणून घ्या, या व्रताची कथा आणि महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे. आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. धर्म शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करतो, त्याच्याकडून देवता, गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते. यावेळी कामिका एकादशी मंगळावर 22 जुलै रोजी आहे.

या एकादशीशी संबंधित कथा...
एका गावामध्ये एक वीर क्षात्रीत रहात होता. एका देवाशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मनासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली. परंतु इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी दिली नाही. ब्राह्मणांनी त्याला, तू ब्रह्म हत्येचा दोषी आहेस असे सांगितले. पहिले तू या पापाचे प्रायश्चित घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू.

यावर त्या क्षत्रियाने या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला? तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की, आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्रीविष्णूंचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान, दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल. ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले. त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन, तुला ब्रह्म हत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले. अशाप्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली.

कामिका एकादशी व्रताचे महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)