आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरारी पौर्णिमा आज : ऐका भगवान सत्यनारायणाची कथा आणि करा दीपदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक मासातील पौर्णिमा अत्यंत पवित्र तिथी आहे. धर्म ग्रंथानुसार भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांनी या तिथीला परम पुण्यदायी सांगितले आहे. या दिवशी गंगा स्नान तसेच संध्याकाळी दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

पुराणानुसार कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मत्स्यावतार घेतला होता. यामुळे या दिवशी करण्यात आलेल्या दान, जप, कर्माचे दहा यज्ञासमान फळ प्राप्त होते. या दिवशी जर कृत्तिका नक्षत्र असेल तर ही महाकार्तिकी तिथी असते. भरणी असेल तर विशेष फळ देते आणि रोहिणी असेल तर या तिथीचे फळ अधिक वाढते.

जो व्यक्ती पूर्ण कार्तिक मासात ब्रह्म मुहूर्तावर स्नान करतात त्यांचे हे व्रत कार्तिक पौर्णिमेला पूर्ण होते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीसत्यनारायण व्रत कथा ऐकली जाते. संध्याकाळच्या वेळी मंदिर, चौक, पिंपळाचे झाड आणि तुळशीजवळ दिवा लावला जातो आणि नदी किनारी दीपदान केले जाते. काशीमध्ये ही तिथी दिवाळी मोहत्सव स्वरुपात साजरी केली जाते.