आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आजही सोपी नाही केदारनाथची यात्रा, पांडवांशी संबंधित आहे इतिहास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या महादेवाचा प्रिय श्रावण महिना सुरु असून या काळामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. शास्त्रानुसार बारा ज्योतिर्लिंगांचे केवळ स्मरणही केल्यास पुण्याची प्राप्ती होते आणि जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. सर्व ज्योतिर्लिंगांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. येथे जाणून घ्या, पांडवांचा काळापासून स्थापित असलेल्या केदारनाथ धामाशी संबंधित खास गोष्टी. असे मानले जाते की, या धामचे निर्माण पांडवांचे वंशज जन्मेजय यांनी केले होते. या संदर्भात आणखी काही कथा प्रचलित आहेत.

मागील वर्षी जून-2013 मध्ये केदारनाथ धाम जप प्रलयामध्ये नष्ट झाले होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु आजही केदारनाथ धामची यात्रा सहज-सोपी झालेली नाही. येथे पोहोचण्याचा रस्ता खूपच कठीण आणि जीव धोक्यात टाकणारा आहे. या क्षेत्रामध्ये आजही वेळोवेळी मुसळधार पाऊस पडत असतो आणि याच कारणामुळे हे सुरक्षित क्षेत्र मानले जात नाही. एवढ्या अडचणी असूनदेखील महादेवाचे भक्त केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी पोहचतात. शासनाकडून केदारनाथ धाम यात्रा सुकर बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि नजीकच्या काळात या यात्रेचा प्रवास सोपा होईल अशी शक्यता आहे.
केदारनाथ धामला केव्हा आणि कसे पोहोचावे
केदारनाथ धाम भारताच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रत्येक वर्षी केदारनाथ धाम मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत भाविकांसाठी खुले असते. येथे पोहचण्यासाठी हेलिकॉप्टरनेसुद्धा यात्रा केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त येथे पोहचण्यासाठी बस मार्गाने यात्रा करावी लागते. केदारनाथ धाम दर्शनासाठी भारतातील कोणत्याही शहरामधून रेल्वेने हरिद्वार किंवा ऋषिकेशला पोहचू शकता. हरिद्वारपासून केदानाथ धामला पोहचण्यासाठी विविध साधन उपलब्ध होतात. यात्रा कठीण आहे, यामुळे आरोग्याची विशेष खबरदारी घ्यावी. जर तुम्हाला विमानाने केदारनाथ यात्रा करण्याची इच्छा असेल तर डेहरादूनपर्यंत विमानसेवा मिळू शकते. डेहरादूनपासून 250 किलोमीटरवर केदारनाथ धाम आहे.

केदारनाथ धाम आणि प्रमुख ठिकाणांमधील अंतर
दिल्ली - केदारनाथ = 460 किमी
ऋषिकेश - केदारनाथ = 225 किमी
हरिद्वार - केदारनाथ = 240 किमी
पुढे जाणून घ्या, केदारनाथ धामशी संबंधित काही खास आणि रोचक गोष्टी...