आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूरच्या जगप्रसिद्ध खजराना गणेशमूर्तीची वाढत आहे उंची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - जगप्रसिद्ध खजराना गणेशाची मूर्ती प्रत्येक वर्षी वाढतच आहे. 1735 मध्ये मूर्तीची स्थापना केल्यानंतर ही तीन फुट उंच आणि सव्वादोन फुट रुंद होती. परंतु आता या मूर्तीची उंची 6 फुट आणि रुंदी 5 फुट झाली आहे.

मंदिराच्या मुख्य पुजारींनी सांगितले, की प्रत्येक वर्षी मूर्ती 1 सेंटीमीटर वाढत आहे. येथील गणेश मूर्तीवर वस्त्र अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या मूर्तीचा आकार वाढत आहे.

येथे श्रीगणेश मूर्तीची स्थापना करताना रिद्धी-सिद्धी मूर्तींचीही स्थापना करण्यात आली होती, परंतु वस्त्र अर्पण करण्याच्या प्रथेमुळे श्रीगणेश मूर्तीचा आकार वाढू लागला. रिद्धी-सिद्धी यांच्या मूर्ती गणेश मूर्तीच्या तुलनेत ठेंगण्या झाल्या. आताही मूळ मूर्तीमध्ये रिद्धी-सिद्धी मूर्तींचे डोळे दिसतात.

स्वप्नात दिले होते देवाने दर्शन
स्थानिक मान्यतेनुसार 1735 मध्ये पंडित मंगल भट्ट यांना स्वप्नामध्ये देवाने दर्शन दिले होते. तेव्हा त्यांना येथे गणेश मूर्ती असल्याचे समजले. या दरम्यान होळकर घराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनाही देवाने स्वप्नात दर्शन देऊन येथे मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी येथे खोदकाम केले. तेथे पाषाणाची एक गणेश मूर्ती निघाली. त्यानंतर येथे श्रीगणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.