आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : उज्जैनमध्ये \'खुनी नागां\'चा दीक्षा विधी, केले स्वतःचे पिंडदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशात उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थमध्ये 5 मे, गुरुवारी जुना आखाड्यात नागा संन्यासी बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जवळपास 700 दिक्षार्थी दीक्षा घेण्यासाठी पोहोचले असून आणखी दिक्षार्थी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जुना आखाडाव्यतिरिक्त इतर आखाड्यांमध्येसुद्धा नागा संन्यासीना दीक्षा देण्याची विधी होणार आहे. आखाड्यांमध्ये याची तयरी केली जात आहे. शुभ मुहूर्तावर दीक्षा देण्यात येईल. दीक्षा विधी पं. शैलेंद्र व संजय वधेका तसेच वाराणसीचे पं. संतोश शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात पहिले नागा दिक्षार्थींचे मुंडण केले जाईल. त्यानंतर भूखी मतापासून लालपुल घाट दरम्यात नवीन संन्यासींचे पिंडदान आणि इतर विधी होतील. त्यानंतर आखाड्यामध्ये पूजा होईल. मध्यरात्री 12 वाजता महामंडलेश्वर नवीन संन्यासींना मंत्र देऊन हवन करतील. त्यानंतर यांना आखाड्यात समाविष्ट करण्याची प्रक्रिया होईल.
का म्हणतात खुनी नागा?
आखाड्यांच्या नियमानुसार केवळ हरिद्वार आणि उज्जौन येथे आयोजित कुंभमध्ये नागा साधुंना दीक्षा दिली जाते. हरिद्वारमध्ये ज्यांना दीक्षा दिली जाते, त्यांना बर्फानी नागा म्हणतात तर उज्जैन येथे दीक्षा घेतलेल्या साधूंना खुनी नागा म्हणतात. खुनी नागाचा अर्थ धर्म रक्षणासाठी हे साधू आपले रक्त सांडायलासुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. नागा साधूंना एखाद्या सैन्याप्रमाणे तयार केले जाते.

कसे बनतात नागा साधू?
एक सामान्य व्यक्तीपासून नागा साधू बनण्याचा मार्ग अत्यंत कठीण आणि आव्हानांनी भरलेला असतो. नागा साधू बनण्यापूर्वी स्वतःचे पिंडदान करावे लागते. वास्तवामध्ये प्रत्येक आखाड्याचे दीक्षा देण्यावुर्वी काही नियम आहेत, परंतु काही नियम सर्व दशनामी आखाड्यांमध्ये सारखे आहेत.

नागा दीक्षाचे एक्सक्लूझिव फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...