आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराडू : राजस्थानातील खजुराहो, 900 वर्षांपासून एका शापामुळे आहे उजाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किराडू राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात स्थित आहे. किराडू आपल्या मंदिरांच्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरांचे निर्माण 11 व्या शतकात झाले होते. किराडूला राजस्थानचे खजुराहो असेही मानले जाते. परंतु किराडूला खजुराहोसारखी ख्याती नाही मिळाली, कारण हे ठिकाण मागील 900 वर्षांपासून उजाड आहे. या ठिकाणी सूर्यास्तानंतर एकही व्यक्ती थांबत नाही. राजस्थानातील इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार किराडू शहर प्राचीन काळी सुख-सुविधायुक्त एक विकसित क्षेत्र होते. इतर राज्यातील लोक येथे व्यापार करण्यासाठी येत होते. परंतु 12 व्या शतकात किराडूवर परमार वंशाचे शासन होते तेव्हापासून हे शहर उजाड झाले. असे का घडले या संदर्भात ठोस माहिती इतिहासात तर उपलब्ध नाही परंतु, या ठिकाणासंदर्भात एक कथा प्रचलित आहे.

पुढे जाणून घ्या, कथा आणि किराडूचा रोचक इतिहास....