आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये अशाप्रकारे स्वस्तिक काढल्यास दूर होते पैशाची तंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्तिक 'सु' आणि 'अस्ति' या दोन शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे.'सु' चा अर्थ शुभ आणि 'अस्ति'चा अर्थ - होणे म्हणजेच ज्यामुळे शुभ होणे, कल्याण होणे तेच स्वस्तिक आहे. हिंदू धर्म प्रथांमध्ये प्रत्येक मंगलकार्य, धार्मिक कर्म, पूजा, उपासनेची सुरुवात स्वतिक काढून केली जाते. स्वस्तिकला देवी शक्ती, शुभ आणि मंगल गोष्टींचे प्रतिक मानण्यात आले आहे.

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा:।
स्वस्तिनस्ता रक्षो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पर्तिदधातु।।

या मंत्रामध्ये चार वेळेस 'स्वस्ति' शब्द स्वरुपात श्रीगणेशासोबत इंद्र, गरुड, पूषा (सुर्य) आणि बृहस्पती यांचे ध्यान आणि आवाहन करण्यात आले आहे.

- या मंगल चिन्हाचे गणेश उपासना, धन, वैभव आणि ऐश्वर्याची देवी लक्ष्मीसोबत, वहीखात्याच्या पूजन प्रथांमध्ये विशेष स्थान आहे. चारही दिशांचे देवता, अग्नी, इंद्र, वरुण आणि सोम पूजेसाठी तसेच सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वस्तिक काढले जाते. हे चारही दिशा आणि जीवनचक्राचे प्रतिक मानले जाते.
- घराची वास्तू ठीक करण्यासाठी स्वस्तिक चिन्हाचा उपयोग केला जातो. स्वस्तिक चिन्हाला भाग्यवर्धक वस्तूंमध्ये समाविष्ट केले जाते. हे चिन्ह काढल्यास नकारात्मक उर्जा घराबाहेर जाते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असल्यास घराच्या मुख्य दरवाजावर थोडेसे गोमित्र शिंपडून दरवाजा स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर कुंकुवाने स्वस्तिक काढावे. या उपायने वास्तुदोष नष्ट होतात. हा उपाय केल्याने आर्थिक अडचणही दूर होते.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, केव्हापासून सुरु आहे स्वस्तिक काढण्याची प्रथा....