आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know Every Little Thing Connected To The Jagannath Temple And Rath Yatra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगन्नाथ रथयात्रा 29 पासून : जाणून घ्या, जगन्नाथ मंदिर आणि यात्रेशी संबंधित खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात विविध प्रथा प्रचलित आहेत. यामधील काही प्रथा धर्माशी एकरूप होऊन लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनल्या आहेत. यातीलच एक प्रथा आहे ओडिशा स्थित पुरी येथे काढण्यात येणारी भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा. हिंदू पंचांगानुसार आषाढ शुक्ल द्वितीया (२९ जून, रविवार) या दिवशी विश्व प्रसिद्ध ही रथयात्रा आयोजित करण्यात येते.

जगन्नाथ रथयात्रेला देश-विदेशातून किमान 10 लाख भाविक भेट देतात. भगवान जगन्नाथ हे जगाचे पालनकर्ते असून रथयात्रेदरम्यान त्यांच्या मंदिरातून बाहेर येऊन रथात विराजमान होऊन सर्व जाती, धर्म भेद सोडून दर्शन देतात. या रथयात्रेत बलभद्र व बहीण सुभद्रा यांचेदेखील रथ असतात. या रथयात्रेचे थेट प्रक्षेपण जगभरातील भक्त आवर्जून पाहतात.

यात्रेचा इतिहास..
रथयात्रेची सुरुवात होते त्या दिवशी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र व देवी सुभद्रा यांना मंदिरातील स्नान बेदी या चौथर्‍यावर स्नान घातले जाते. त्यानंतर तिन्ही देव 15 दिवसांसाठी भाविकांपासून वेगळे एकटे राहतात. या काळाला ‘अनावसरा’ म्हणतात. या काळात कोणतीही पूजा होत नाही. 15 दिवसांनंतर भगवान मंदिराबाहेर येतात आणि त्यानंतर रंगीबेरंगी रथयात्रा सुरू होते. जगन्नाथ रथयात्रेचे महत्त्व हिंदू-बौद्ध-जैन धर्माच्या इतिहासात वर्णन केले आहे. भगवान जगन्नाथ देवाची पूजा ओडिशामधील ‘सावरास’ नावाचे आदिवासी करायचे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या यात्रेचा इतिहास, यात्रेचे स्वरूप, जगन्नाथ मंदिराची रचना, कशी होते रथनिर्मिती आणि इतरही रोचक गोष्टी...