आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How To Immersion Goddess Durga In Divya Marathi

दसरा : जाणून घ्या, दुर्गा मूर्ती विसर्जन आणि शस्त्र पूजनाचा विधी, शुभ मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार अश्विन मासातील दशमी तिथीला विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो. पुराणानुसार या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याचा विजयाच्या आनंदात हा सण संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी हा सण 3 ऑक्टोबर, शुक्रवारी आहे. दशमी तिथीला दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते तसेच या दिवशी भगवान श्रीरामाची आणि शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. येथे जाणून घ्या, दुर्गा विसर्जनाचा संपूर्ण विधी....

विसर्जनापूर्वी दुर्गा देवीच्या मूर्तीची गंध, अक्षता, फुल अर्पण करून पूजा करा तसेच खालील मंत्राचे स्मरण करा...
रूपं देहि यशो देहि भाग्यं भगवति देहि मे।
पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे।।
महिषघ्नि महामाये चामुण्डे मुण्डमालिनी।
आयुरारोग्यमैश्वर्यं देहि देवि नमोस्तु ते।।

त्यानंतर हातामध्ये अक्षता, फुल घेऊन देवी भगवतीचे या मंत्राचा उच्चार करून विसर्जन करावे...
गच्छ गच्छ सुरश्रेष्ठे स्वस्थानं परमेश्वरि।
पूजाराधनकाले च पुनरागमनाय च।।

अशाप्रकारे विधीव्रत पूजन केल्यानंतर देवीच्या मूर्तीचे विसर्जन करावे.

शस्त्र पूजनाचा विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)