आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउंटन डे स्पेशल : असा पर्वत जेथे स्वतः राहतात देवांचे देव महादेव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उंच-उंच पर्वत आणि आनंददायी, प्रसन्न करणार्‍या वातावरणाचा मनात केवळ विचार आला तरी शांत वाटू लागते. पर्वतांचे सौंदर्यही असेच काहीसे आहे, जे आपल्याला आकर्षित करते. काही पर्वत, शिखर एवढे सुंदर आहेत की, त्याठिकाणी देवता निवास करतात असे मानले जाते. 11 डिसेंबरला 'इंटरनॅशनल माउंटन डे' आहे. 'माउंटन डे'च्या निमित्ताने देवतांचे निवासस्थान मानल्या जाणार्‍या विविध पर्वतांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

या सिरीजमध्ये सर्वात पहिले आम्ही तुम्हाला महादेवाचे निवासस्थान मानल्या जाणार्‍या हिमालयातील कैलास पर्वताची माहिती सांगत आहोत. याच कारणामुळे कैलास मानसरोवर संपूर्ण हिमालय क्षेत्रातील सर्वात जास्त अध्यात्मिक संवेदना असणारा भाग मानला जातो. याठिकाणी साक्षात महादेवाचा अनुभव केला जाऊ शकतो असे मानले जाते. या पर्वताला गणपर्वत आणि रजतगिरी असेही म्हणतात. मानसरोवराची यात्रा व्यास, भीम, कृष्ण, दत्तात्रय इ. केली आहे. या व्यतिरिक्त विविध ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले आहे. काही लोकांच्या मतानुसार आदी शंकराचार्यांनी याच पर्वताच्या जवळपास देहत्याग केला होता. शिवपुराणामध्ये या जागेला ब्रह्मांडाचे केंद्र सांगण्यात आले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कैलास पर्वताशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...