आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत धर्म ग्रंथांमधील 8 महान गुरु, हे 2 आजही आहेत जिवंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासूनच गुरूंचा मान-सन्मान करण्याची प्रथा चालू आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गुरूंचे वर्णन आढळून येते, ज्यांनी गुरु-शिष्याच्या नात्याला एक विशिष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. यामध्ये परशुराम आणि महर्षी वेदव्यास यांना आजही जिवंत असल्याचे मानले जाते. आज (9 जुलै, रविवार) गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या महान गुरुंविषयी खास माहिती देत आहोत.

परशुराम -
परशुराम महान योद्धा आणि गुरु होते. हे जन्मापासूनच ब्राह्मण होते परंतु यांचा स्वभाव क्षत्रियांसारखा होता. हे भगवान विष्णूंचे अंशावतार होते. यांनी महादेवाकडून अस्त्र-शास्त्राची विद्या अर्जित केली होती. यांच्या वडिलांचे नाव जमदग्नी तसेच आईचे नाव रेणुका होते. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी यांनी अनेकवेळा पृथ्वीला क्षत्रिय विहीन केले होते. भीष्म, द्रोणाचार्य यांचे शिष्य होते. धर्म ग्रंथानुसार परशुराम अमर असून आजही पृथ्वीवर कुठेतरी तपश्चर्येत लीन आहेत.

कर्णाला दिला होता शाप -
महाभारतानुसार कारण परशुरामांचा शिष्य होता. कर्णाने परशुराम यांना स्वतःची ओळख ब्राह्मण पुत्राच्या रुपात दिली होती. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते. त्याच वेळी एक किडा कर्णाच्या मांडीला चावला. गुरूंची झोप मोडू नये म्हणून कर्णाने सर्व वदन सहन केल्या. झोपेतून उठल्यानंतर गुरु परशुराम यांच्या लक्षात आले की, कर्ण ब्राह्मण पुत्र नसून क्षत्रिय आहे. तेव्हा क्रोधीत परशुरामांनी कर्णाला शाप दिला की, मी शिकवलेली सर्व शास्त्र-अस्त्रांची विद्या तुला खूप आवश्यकता असेल तेव्हा विसरून जाशील. अशाप्रकारे गुरूंच्या शापामुळे कर्णाचा मृत्यू झाला.

पुढे जाणून घ्या, इतर काही महान गुरु-शिष्यांची रोचक माहिती...
बातम्या आणखी आहेत...