आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक चतुर्थी आज : या सोप्या विधीने करा श्रीगणेशाची पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचागानुसार प्रत्येक मासातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीला श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. या महिन्यात हे व्रत आज (४ मार्च, मंगळवार) करू शकता. आजच्या दिवशी श्रीगणेशाचे पूजन करण्याचे विधान आहे. धर्म ग्रंथानुसार हे व्रत केल्याने श्रीगणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

विनायक चतुर्थी व्रत विधी -
- सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे.
- इच्छेनुसार सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
- संकल्प मंत्रानंतर, षोडशोपचार पूजा करावी व आरती म्हणावी. श्रीगणेशाला गुलाल अर्पण करावा. गणेश मंत्र (ऊँ गं गणपतयै नम:) उच्चार करीत २१ दुर्वा अर्पण कराव्यात.
- २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा. ५ मोदक मूर्तीजवळ ठेवावेत आणि ५ मोदक ब्राह्मणाला द्यावेत. शिल्लक राहिलेले मोदक प्रसाद स्वरुपात सर्वांना वाटावे.
- पूजा करताना श्रीगणेश स्तोत्र, अथर्वशीर्षचे पाठ करावेत.
- ब्राह्मणांना भोजनास बोलवावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. त्यानंतर आपण भोजन करावे. शक्य असल्यास उपवास करावा.
- श्रद्धापूर्वक हे व्रत केल्यास श्रीगणेशाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख-समृद्धी राहते.