जर एखाद्या व्यक्तीची मकर लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील प्रथम, द्वितीय स्थानात सूर्य स्थित असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो.
मकर लग्न कुंडलीत प्रथम स्थानात सूर्य असेल तर...
कुंडलीतील प्रथम स्थान शरीर कारक स्थान असते. मकर लग्न कुन्द्ल्लीत प्रथम स्थानात मकर राशीचा स्वामी शनि आहे. शनि आणि सूर्याची शत्रुता आहे, यामुळे शनीच्या राशीत सूर्य असल्यामुळे व्यक्तीला शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता राहते. मकर राशीत सूर्य असल्यामुळे व्यक्ती तणावात राहतो. यांचा स्वभाव तेजस्वी असतो. हे लोक समाजात पूर्ण मान-सन्मान प्राप्त करतात.
मकर लग्न कुंडलीत द्वितीय स्थानात सूर्य असेल तर...
मकर लग्न कुंडलीत द्वितीय स्थान कुंभ राशीचे असून स्वामी शनि आहे. या स्थानात सूर्य असल्यास व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. हे स्थान घर आणि कुटुंबाशी संबंधित स्थान आहे. शनीच्य कुंभ राशीत सूर्य असल्यास व्यक्तीला कुटुंबाकडून पूर्ण सुख मिळत नाही. हे लोक खूप कष्ट करतात परंतु धन संचय करू शकत नाहीत. तरीसुद्धा यांचे जीवन आधुनिक सुविधांनी पूर्ण असते.
(फोटो : मकर राशीचे संग्रहित छायाचित्र)