आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Importance Of Adhik Maas Start From 17 June

अधिक मास 17 पासून : जाणून घ्या, महत्त्व आणि खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी १७ जून, बुधवारपासून अधिक महिना सुरू होणार असून २६ जुलैला त्याची सांगता होईल. मराठी कालगणनेनुसार वर्षाचे बाराच महिने असतात, परंतु दर तीन वर्षांनी एक महिना जास्त धरावा लागतो. त्या तेराव्या महिन्याला अधिक मास म्हणतात. मलमास यास पुरुषाेत्तम मास संबाेधले जाते. याविषयी असे म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्णाने हे नाव दिले. थाेडक्यात मलमास या नावास पुरुषाेत्तम मास देऊन पावित्र्य वाढविले आहे.

काय आहे अधिक मास?
ख्रिश्चन कालगणनेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात, तर मराठी कालगणनेनुसार वर्षाचे ३५४ दिवस असतात. ख्रिश्चन कालगणना चंद्रावर, तर मराठी कालगणना सूर्यावर आधारित असते. ख्रिश्चन कालगणनेत दर तीन वर्षांनी लीप वर्ष असते, तर मराठी कालगणनेच्या दिवसांची तूट भरून काढण्यासाठी दर ३२ महिने १६ दिवसांनी म्हणजेच तीन वर्षांनी येणारा महिना हा अधिक मास ठरवला आहे.

पुढे जाणून घ्या, अधिक मासात काय करावे आणि इतर काही खास गोष्टी...