Home | Jeevan Mantra | Dharm | Know The Importance Of Putrada Ekadashi

संक्रांतीपुर्वी 11 जानेवारी आहे शुभ दिवस, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे उपाय

धर्म डेस्क | Update - Jan 10, 2014, 03:47 PM IST

नवीन वर्षात पहिल्या महिन्यातील ११ जानेवारी, शनिवार हा खूप खास दिवस आहे.

 • Know The Importance Of Putrada Ekadashi

  नवीन वर्षात पहिल्या महिन्यातील ११ जानेवारी, शनिवार हा खूप खास दिवस आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास कुटुंब, व्यवसाय, नोकरीमधील अडचणी समाप्त होऊ शकतात. या दिवशी पुत्रदा एकादशी असून शास्त्रामध्ये या एकादशीचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. एकादशीच्या दिवशी महालक्ष्मीचे स्वामी भगवान श्रीहरी विष्णूचे पूजन केल्यास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. या दिवशी विष्णूदेवाची पूजा करणार्‍या व्यक्तीला जीवनात पैशाची कमतरता भासत नाही.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या या एकादशी संबंधित खास गोष्टी आणि उपाय...

 • Know The Importance Of Putrada Ekadashi

  पुत्रदा एकादशीची प्राचीन कथा...
  एका महिन्यात दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीच्या संदर्भात शास्त्रामध्ये वेगवेगळ्या कथा सांगण्यात आल्या आहेत. पुत्रदा एकादशीच्या संबंधात याठिकाणी सांगण्यात आलेली कथा खूप प्रचलित आहे.
  प्राचीन काळात एक प्रतापी सुकेतू नावाचा राजा होता. राजाला मुल नसल्यामुळे तो नेहमी चिंताग्रस्त राहत असे. एके दिवशी राजा घोर जंगलात गेला. त्याठिकाणी राजाला एक आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये तपस्वी ऋषींचा वास होता. राजा त्या ऋषींसमोर गेला आणि त्यांना नमस्कार करून आपल्या चिंतेचे कारण सांगितले.
  ऋषी विश्ववेद यांनी राजाला एक उपाय सांगितला. पौष मासातील शुक्ल पक्षात येणार्‍या एकादशीचे व्रत आणि पूजन करावे. या उपायाने तुला मुलाची प्राप्ती होईल असे ऋषी विश्ववेद यांनी सांगितले.
  राजाने ऋषी विश्ववेद यांनी सांगितलेले व्रत केले आणि थोड्या दिवसांनंतर राणी गर्भवती राहिली आणि राजाला धर्मात्मा आणि गुणवान असे पुत्ररत्न प्राप्त झाले.
  एकादशी व्रत विधी आणि या दिवशी करण्यात येणारे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Know The Importance Of Putrada Ekadashi

  पुत्र प्राप्तीची इच्छा असणारे जे लोक हे व्रत करण्यास इच्छुक आहेत त्यांनी दशमी तिथीला फक्त एकदा अन्नग्रहण करावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर जल, तुळस, तीळ, फुल आणि पंचामृत या पूजन सामग्रीने श्रीहरी विष्णूची पूजा करावी. हे व्रत करणार्‍या व्यक्तीने दिवसभर निर्जळी उपवास करावा. संध्याकाळी दीपदान आणि त्यानंतर फलाहार केला जाऊ शकतो. दुसर्‍या दिवशी द्वादशी तिथीला गरजू व्यक्तीला दान करावे.

 • Know The Importance Of Putrada Ekadashi

  लक्ष्मी, भगवान नारायण यांची पत्नी असून त्यांना अत्यंत प्रिय आहेत. लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे. शंख, मोती, कवडी या वस्तू समुद्रातून प्राप्त होतात, या कारणामुळे भगवान नारायणाला या गोष्टी प्रिय आहेत. यामुळे या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा करावी त्याचबरोबर समुद्रातून प्राप्त होणार्‍या वस्तूंचाही पूजेमध्ये समावेश करावा. पूजा झाल्यांनतर या वस्तू धन स्थानावर स्थापन कराव्यात.

 • Know The Importance Of Putrada Ekadashi

  - या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशदारावर लक्ष्मीच्या गृहप्रवेश करणार्‍या पादुका लावाव्यात.
  - श्रीयंत्र, कनकधारा यंत्र, कुबेर यंत्र सिद्ध करून देवघरात किंवा तिजोरीत ठेवावे.  
  - दक्षिणावर्ती शंखाची देवघरात स्थापना केल्यास धनागमन आणि सुख प्राप्ती होईल.

 • Know The Importance Of Putrada Ekadashi

  - या दिवशी रूटीच्या झाडापासून तयार झालेल्या गणेशाची पूजा करावी.
  - एकाक्षी नारळाची पूजा करून हे नारळ तिजोरीत ठेवावे.
  - संध्याकाळी लक्ष्मीसमोर दिवा लावल्यानंतर खालील मंत्राचा जप करावा.
  मंत्र - ऊँ महालक्ष्मयै नम:

Trending