हिंदू प्राचीन धर्म ग्रंथामध्ये सूर्याला देवता मानण्यात आले आहे. सूर्य हे साक्षात दिसणारे एकमेव देवता आहेत. वेदामध्ये सूर्यदेवाला तेज, ओज, आयुची वृद्धी करणारे मानले गेले आहे. ज्योतिष शास्त्रात सूर्य आत्मा आणि पिता कारक देव आहे. सूर्य एक असा ग्रह आहे जो व्यक्तीला मान-सन्मान, चांगली पर्सनॅलिटी व जॉबमध्ये पद आणि अधिकार मिळवून देतो. ग्रहांचा राजा असल्यामुळे सूर्यदेवाचे पूजन समाजात उच्च स्थान प्राप्त करून देते.
यामुळे मान-सन्मानाच्या प्राप्तीसाठी, सरकारी कामातील अडचणी दूर करण्यासाठी आणि आत्मबळ वृद्धीसाठी उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचे आणि अर्घ्य देण्याचे विधान आहे. सूर्यदेवाचा दिवस रविवार मानण्यात आला आहे, परंतु दररोज सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. जर पहिल्यांदाच सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर रविवारपासून सुरुवात करावी.
अशाप्रकारे द्यावे सूर्याला अर्घ्य
अर्घ्य देण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्नान करून तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यामध्ये लाल चंदन, अक्षता, लाल फुल टाकून दोन्ही हात सूर्यदेवाकडे करून सूर्य गायत्री मंत्र (ऊँ भास्कराय विद्महे आदित्याय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्) किंवा ऊँ सूर्याय नमः अर्घ्यं समर्पयामि मंत्राचा उच्चार करून जल अर्पण करावे. जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा.
पुढे जाणून घ्या, सूर्याला अर्घ्य दिल्याने कोणकोणते लाभ प्राप्त होतात...