Home | Jeevan Mantra | Dharm | Know The Important Rules About Food In Mahabharat

PHOTOS : महाभारतातील या 10 गोष्टी लक्षात ठेवा, असे अन्न ग्रहण करू नये

धर्म डेस्क | Update - Jan 14, 2014, 02:40 PM IST

शरीरला शक्ती आणि उर्जा मिळत राहण्यासाठी शुद्ध आणि ताजा आहार घेणे आवश्यक आहे

 • Know The Important Rules About Food In Mahabharat

  शरीरला शक्ती आणि उर्जा मिळत राहण्यासाठी शुद्ध आणि ताजा आहार घेणे आवश्यक आहे. परंतु आपण कोणत्या प्रकरच्या अन्नाचे सेवन करू नये हे फार कमी लोकांना माहिती असावे. काहीवेळेस अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे ताजे अन्न खाण्यायोग्य राहत नाही. अशा परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

  महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये अन्नासंबंधी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास शरीराचे पावित्र्य चांगले राहते तसेच आरोग्यही उत्तम राहते.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि महाभारत ग्रंथानुसार जाणून घ्या, जेवणासंबंधीचे खास नियम...

 • Know The Important Rules About Food In Mahabharat

  - महाभारतातील अनुशासन पर्वानुसार जेवणासंबंधी काही महत्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. यानुसार एखाद्या व्यक्तीने अन्न ओलांडले तर ते अन्न खाऊ नये. असे जेवण अपवित्र आणि राक्षसांचा आहार बनते.
  - जे अन्न भांडण, वाद-विवाद करून मिळवलेले असेल, असे अन्न खाऊ नये.
  - अन्नावर एखाद्या रजस्वला स्त्रीची सावली पडली असेल तर ते अन्न दुषित होते. असे अन्न खाऊ नये.

 • Know The Important Rules About Food In Mahabharat

  - जर अन्नाला कुत्र्याने स्पर्श केला असेल किंवा त्याकडे त्याची नजर गेली असेल तर असे अन्न अपवित्र होते.
  -जेवणामध्ये केस निघाल्यास असे जेवणही अपवित्र होते. असे अन्न खाऊ नये.

 • Know The Important Rules About Food In Mahabharat

  - जर जेवणामध्ये किडे पडले तर असे जेवण अशुद्ध होते.असे जेवण जेवल्यास आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.
  -जर जेवण एखाद्या व्यक्तीच्या शिंकेमुळे किंवा आश्रुमुळे दुषित झाले तर असे अन्न खाऊ नये.

 • Know The Important Rules About Food In Mahabharat

  - जर एखाद्या दुराचारी व्यक्तीने आपल्या जेवणामधील अन्न खाल्ले तर ते जेवण करू नये.
  - जेवण देव, पितर, अतिथी आणि लहान मुलांना दिल्याशिवाय करू नये.

Trending