आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रौपदीचा जन्म गर्भातून नाही तर अशाप्रकारे झाला, यामुळे मिळाले 5 पती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी आणि पांडवांची पत्नी होती. कौरवांनी आयोजित केलेल्या जुगाराच्या खेळात द्रौपदीला पणाला लावण्यात आले होते. पांडव या खेळामध्ये हरले आणि त्यानंतर दुशासनाने भर सभेत द्रौपदीला अपमानित केले. द्रौपदीच्या आयुष्यातील हे पैलू जवळपास सर्वांना माहिती असावेत परंतु फार कमी लोकांना द्रौपदीसंदर्भातील अनेक रहस्यमयी गोष्टी माहिती नसाव्यात. आज आम्ही तुम्हाला या खास गोष्टींची माहिती देत आहोत...

गर्भातून नाही झाला द्रौपदीचा जन्म -
महाभारत ग्रंथानुसार राजा द्रुपद पांडवांकडून पराभूत झाल्यानंतर चिंताग्रस्त होते. द्रोणाचार्यांमुळे युद्धात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. राजा द्रुपद चिंतेमुळे कमजोर झाले होते. द्रोणाचार्यांचा वध करणारा मुलगा प्राप्त व्हावा यासाठी ते एका आश्रमातून दुसर्या आश्रमात भटकू लागले. या प्रवसात त्यांना दोन ब्राह्मण याज आणि उपयाज हे भेटले. द्रुपद राजाने छोटा भाऊ उपयाजकडे पुत्र प्राप्तीसाठी हवन करण्याची प्रार्थना केली. त्यानंतर उपयाजच्या सांगण्यावरून त्यांनी याजला प्रार्थना केली. त्यानंतर याजने राजा द्रुपदच्या राज्यात पुत्र प्राप्तीसाठी हवन(यज्ञ) केले.

त्या अग्निकुंडातून एक दिव्य कुमार प्रकट झाला. तो कुमार अग्निकुंडातून प्रकट होताच गर्जना करत, रथावर बसून इकडे-तिकडे फिरू लागला. त्याच वेदी म्हणजे हवनकुंडातून कुमारी पांचालीचासुद्धा जन्म झाला. पांचाली म्हणजे राजा द्रुपदची मुलगी कमळाच्या पानाप्रमाणे डोळे असलेले, निळे-निळे कुरुळे केस व कोमल ओठ असलेली होते. तिचा रंग सावळा होता. एखादी देवांगना मनुष्य शरीर धारण करून पृथ्वीवर अवतरली असे वाटत होते. त्यानंतर ब्राह्मणांनी दिव्य कुमार आणि कुमारीकीचे नामकरण(नाव ठेवले) केले. त्यांनी सांगितले हा कुमार असहिष्णु आणि ताकदवान व रूपवान असण्यासोबतच कवच कुंडल धारण केलेला आहे. यावर अग्नीचा प्रभाव राहणार नाही. यामुळे याचे नाव धृष्टद्युम्र असेल. ही कुमारी कृष्ण वर्ण असल्यामुळे हिचे नाव कृष्णा असेल.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, द्रौपदीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...