आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रौपदी कशी राहत होती पांडवांसोबत? हा होता 1 खास नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारताविषयी सर्वांनाच माहिती असेल परंतु ही कथा फक्त कौरव पांडवांच्या युध्दापर्यंत मर्यादीत नाही. महाभारताची कथा जेवढी मोठी आहे तेवढी मनोरंजकही आहे. कौरव पांडवांव्यतिरिक्त यामध्ये अनेक राजांच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी कथा वाचायला मिळतात. शास्त्रांमध्ये महाभारताला पाचवा वेदही म्हटले गेले आहे. याचे रचनाकार महर्षि कृष्णव्दैपायन वेदव्यास आहेत. या ग्रंथामध्ये एक लाख श्लोक आहेत, यामुळे याला शतसाहस्त्री संहिता देखील म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला ग्रंथाच्या काही मनोरंजर गोष्टी सांगणार आहोत...

1. पांडवांनी द्रोपदीसाठी बनवला होता एक खास नियम
द्रौपदीसोबत विवाहनंतर एक दिवस नारदमुनी पांडवांना भेटण्यास गेले. त्यांनी पांडवांना सांगितले की, प्राचीन काळात सुंद-उपसुंद नावाचे दोन राक्षस भाऊ होते. त्यांनी आपल्या पराक्रमाने देवतांवर विजय मिळवला होता. परंतु एका स्त्रीच्या कारणामुळे त्यांच्यात फूट पडली. त्या दोघांना एकमेकांचा वध केला. अशी स्थिती तुमच्यावर येऊ नये यासाठी नियम तयार करा. तेव्हा पांडवांनी द्रौपदीसाठी एक नियम बनवला, एका नियमित वेळेपर्यंत द्रौपदी एका भावाजवळ राहिल. जेव्हा एक भाऊ द्रौपदीसोबत एकांतात असेल तेव्हा दुसरा भाऊ तेथे जाणार नाही. जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला 12 वर्षे ब्रम्हचारी राहुन वनात जावे लागेल.

पुढील स्लाईडवर वाचा... अर्जुनाने हा नियम का तोडला आणि इतरही रोचक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...