Home | Jeevan Mantra | Dharm | know The Measure For Devuthani Ekadash

13 नोव्हेंबर : लक्ष्मी कृपा प्राप्त करण्याचा आणखी एक खास दिवस, करा हे सोपे उपाय

धर्म डेस्क | Update - Nov 11, 2013, 12:55 PM IST

कार्तिक मासातील अमावस्या म्हणजे दिवाळीनंतर लक्ष्मीकृपा प्राप्त करण्याचा आणखी एक खास दिवस जवळ आला आहे.

 • know The Measure For Devuthani Ekadash

  कार्तिक मासातील अमावस्या म्हणजे दिवाळीनंतर लक्ष्मीकृपा प्राप्त करण्याचा आणखी एक खास दिवस जवळ आला आहे. हा दिवस आहे, बुधवार १३ नोव्हेंबर २०१३.कार्तिक मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला देवउठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या एकादशीच्या दिवशी महालक्ष्मीचे स्वामी म्हणजे भगवान विष्णू झोपेतून जागे होतात.

  आषाढ मासातील शुक्ल पक्ष एकादशीला श्रीहरी शयन करतात आणि चार महिन्यानंतर कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशीला जागे होतात. श्रीविष्णूच्या शयन काळात सर्व मंगलकार्य वर्जित असतात.

  भगवान विष्णू बुधवारी पुन्हा जागे होत असल्याने या दिवशी विशेष महत्व आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास महालक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, खास उपाय....

 • know The Measure For Devuthani Ekadash

  - आषाढी एकादशीस देवशयनी (भगवान श्रीविष्णु झोपतात)आणि कार्तिक एकादशीस प्रबोधिनी( भगवान श्रीविष्णु जागे होतात) एकादशी म्हणतात.
  - धर्मशास्त्रानुसार या दिवसांत भगवान विष्णूंचे वास्तव्य पाताळात असते. या काळात ते क्षीरसागरात निद्रा घेतात. मग चार महिन्यानंतर तूळ राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर पुन्हा ते सृष्टीचे संचालन करू लागतात.
  - शास्त्रानुसार जे लोक या एकादशीचे व्रत करतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

 • know The Measure For Devuthani Ekadash

  या एकादशीनंतर द्वादशीपासून तुळशी विवाह लग्नसराईला प्रारंभ होतो. जो व्यक्ती या प्रथेचे पालन करतो त्याच्या घरी स्थायी लक्ष्मीचा वास राहतो. तुळशी विवाह करणे शक्य नसेल तर कमीतकमी तुळशीचे विशेष पूजन करावे.

 • know The Measure For Devuthani Ekadash

  कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे व्रत केल्यास एक सहस्त्र अश्वमेध यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य मिळते असे मानले जाते. तुळशीचे लग्न विष्णूशी लावले जाते, ज्याने न जमणा-यांचे विवाह लवकर जुळतात, अखंडित सौभाग्य प्राप्त होते आणि लक्ष्मीही स्थिर राहते असे शास्त्र सांगते. ज्यांच्या पत्रिकेत दोन विवाह, घटस्फोट, पतीविरह यांसारखे अनिष्ट योग आहेत त्यांनी जर तुळशीविवाहाचे व्रत केले तर लाभदायी ठरते.

 • know The Measure For Devuthani Ekadash

  - एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लाल मिरची टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या. या उपायाने तुम्हाला पाहिजे त्याठिकाणी बदली आणि प्रमोशन मिळेल. हा योय नियमित करावा.

 • know The Measure For Devuthani Ekadash

  -  महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर दुध, जल अर्पण करावे. दिवा लावावा. या उपायाने स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होईल.
  - या दिवशी सकाळी लवकर उठून तुळशीच्या पानांचा हार महालक्ष्मीला अर्पण करावा. हा उपाय केल्यास धन वृद्धी होईल.

 • know The Measure For Devuthani Ekadash

  - एकादशीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या मंदिरात जाऊन एक सुपारी आणि तांब्याचा कलश ठेवून यावा. त्यासोबत थोडी दक्षिणाही ठेवावी. या उपायाने सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होईल.
  - या दिवशी शक्य असल्यास एखाद्या तृत‍ियपंथीकडून त्याच्या स्वखुशीने एक रुपया घेऊन आपल्या पाकिटात ठेवावा.

 • know The Measure For Devuthani Ekadash

  - एकादशीच्या दिवशी रात्री लक्ष्मी आणि कुबेरदेवाचे पूजन करावे तसेच खाली दिलेल्या मंत्राचा एक माळ जप करावा.
  मंत्र : ऊँ यक्षाय कुबेराय वैश्रववाय, धन-धान्यधिपतये धन-धान्य समृद्धि मम देहि दापय स्वाहा।

 • know The Measure For Devuthani Ekadash

  - रात्री झोपण्यापूर्वी घराजवळील चौकामध्ये तेलाचा दिवा लावून यावा. घरी परत येताना मागे वळून पाहू नका.
  - महादेवाच्या मंदिरात जाऊन अक्षता(तांदूळ) अर्पण करा. लक्षात ठेवा अक्षता खंडित नसाव्यात. अखंड अक्षता अर्पण कराव्यात.

 • know The Measure For Devuthani Ekadash

  - दररोज घरामध्ये पूजा झाल्यानंतर शंखनाद करावा, यामुळे नकारात्मक उर्जा नष्ट होते. महालक्ष्मीचे घरामध्ये आगमन होते.

Trending