आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Measure For Purnima Night On 12 June 2014

गुरुवार 12 जूनची रात्र आहे खूप खास, या रात्री अवश्य करा ही चार कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार 12 जून 2014ला पौर्णिमा आहे. शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे, कारण पौर्णिमेची रात्र देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रेष्ठ आहे. या रात्री करण्यात आलेले उपाय खूप लवकर शुभफळ प्रदान करतात.

ज्या लोकांना कामामध्ये यश मिळत नसेल किंवा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर त्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहावेत. हे उपाय एकदम सोपे आणि चमत्कारी आहेत, या उपायांनी महालक्ष्मी तसेच इतर देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होते.

चंद्राच्या प्रकाशात बसावे
पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतो. याच कारणामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात अवश्य बसावे. काही काळ चंद्राकडे पाहावे. पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे पाहिल्यास डोळ्यांना थंडावा मिळेल तसेच डोळ्यांची शक्ती वाढेल. या रात्री चंद्र आपल्या पूर्ण कलांमध्ये दिसतो, यामुळे चंद्र प्रकाशाचा आपल्या शरीरावर चमत्कारी प्रभाव पडतो.

पुढे जाणून घ्या, पौर्णिमेच्या रात्री कोणकोणते काम करावेत...