आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रानुसार, घरात तुळस असेल तर या 10 गोष्टी अवश्य जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू घरांमध्ये तुळशीचे रोपटे आवश्य सते. घरातील अंगणात तुळस लावणे ही प्रथा शतकानुशतके चालू आहे. शास्त्रामध्ये तुळशीला पूजनीय, पवित्र आणि देवी स्वरूप मानण्यात आले असल्यामुळे घरामध्ये तुळस असल्यास काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास सर्व देवी-देवतांची विशेष कृपा आपल्या घरावर राहते. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते तसेच पैशाची कमतरता भासत नाही. कुटुंबातील सदस्यांना आरोग्यदायी लाभ होतात. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये तुळशी संदर्भात सांगण्यात आलेल्या खास 10 गोष्टी....

शिवलिंगावर तुळशीचे पाने अर्पण करू नयेत...
शिवपुराणानुसार शिवलिंगावर तुळशीचे पाने अर्पण करू नयेत. या संदर्भात एक कथा सांगण्यात आली आहे. या कथेनुसार प्राचीन काळी दैत्यांचा राजा शंखचूडच्या पत्नीचे नाव तुलसी होते. तिच्या पतिव्रता धर्म शक्तीमुळे देवता शंखचूडला पराभूत करू शकत नव्हते. तेव्हा भगवान विष्णूंनी कपटाने तुळशीचे पतिव्रत भंग केले. त्यानंतर महादेवाने शंखचूडचा वध केला.

जेव्हा ही गोष्ट तुळशीला समजली तेव्हा तिने भगवान विष्णूला दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंनी तुळशीचा शाप स्वीकारला आणि सांगितले की, तू पृथ्वीवर गंडकी नदी तसेच तुळशीच्या रुपात राहशील. तेव्हापासून जवळपास सर्व पूजन कर्मामध्ये तुळशीचा उपयोग विशेष रुपात करण्यात येत आहे, परंतु शंखचूडची पत्नी असल्यामुळे तुळस शिवलिंगावर अर्पण केली जात नाही.

पुढे जाणून घ्या, तुळशीशी संबंधित इतर खास 9 गोष्टी...