सध्याच्या काळात अनेक लोक असे आहेत जे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाहीत आणि यामुळे वेळेपूर्वीच यांना म्हातारपणाला सामोरे जावे लागते. म्हातारपणाचे आजार म्हणजे लवकर केस पांढरे होणे, शरीर कमजोर होणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, पचनतंत्र बिघडणे, दृष्टी कमी होणे इ. सामान्यतः हे सर्व आजार वृद्धावस्थेमध्ये होतात, परंतु सध्या स्थिती वेगळीच आहे. तारुण्यातच अनेक तरुण या आजारांनी पिडीत आहेत.
या आजारांपासून दूर राहण्यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जर एखादा व्यक्ती जेवण केल्यानंतर लगेच स्नान करत असेल तर त्याचा कफ वाढतो. जेवण केल्यानंतर लगेच चालणे, पळणे, शेकणे या क्रिया केल्यास शरीरातील वात रोग वाढतात. या रोगांमुळे शरीर कमजोर होते आणि वृद्धावस्था लवकर येते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, येथे सांगण्यात येत आहे की, या रोगांपासून कसे दूर राहावे ज्यामुळे अकाळी वृद्धावास्थेला सामोरे जावे लागणार नाही.
64 प्रकारचे असतात रोग, ज्यामुळे येते म्हातारपण आणि शरीर होते कमजोर
वात, पित्त आणि कफ हे रोगाचे तीन प्रकार आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक रोग म्हणजे ज्वर(ताप). हे रोगाचे मुख्य भेद(प्रकार) आहेत. याचे प्रभेद (उपप्रकार) कुष्ट, खोकला, मुत्र संबंधित रोग, रक्त विकार, अतिसार, ज्वर इ आहेत. या सर्व भेद आणि प्रभेदाना मिळून एकूण 64 प्रकारचे रोग सांगण्यात आले आहेत.
या सर्व रोगांना वाढवणारी कामे कोणकोणती आहेत, हे पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)