आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान करू शकतात गीतेमधील हे 11 सूत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला गीता जयंती ( या वर्षी 10 डिसेंबर, शनिवारी) साजरी केली जाते. धर्म ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी मोहात अडकलेल्या अर्जुनला गीतेचा उपदेश दिला होता. भगवद‌्गीता हा ग्रंथ ज्याकाळी भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर कथन केला, त्याकाळी त्यातील तत्त्वज्ञान जितके उपयुक्त आणि कल्याणकारी होते, तेवढेच लाभदायक प्रत्येक माणसासाठी ते आजही आहे. भले संदर्भ बदलले असतील. परंतु, अखिल मानवजातीच्या कल्याणाचा पाया गीतेत तसाच्या तसा आहे. म्हणून त्याची जयंती साजरी करणे, त्याचे पठण-श्रवण आजही आणि भविष्यातही महत्त्वपूर्ण आणि साजेसे राहील. सदासर्वकाळ गीता एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. ती माणसाला कल्याण मार्गाकडे नेणारी आहे. येथ जाणून घ्या, गीतेमधील काही खास श्लोक आणि त्याचे अर्थ.

श्लोक
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामः क्रोधस्तथा लोभस्तरमादेतत्त्रयं त्यजेत्।।

अर्थ - काम, क्रोध आणि लोभ. हे तीन प्रकारचे नरकाचे द्वार आत्म्याचा नाश करणारे आहेत, म्हणजेच अधोगती करणारे आहेत. यामुळे या तिघांचा त्याग करावा.

मॅनेजमेंट सूत्र - काम म्हणजे इच्छा, क्रोध आणि लोभ सर्व वाईटाचे मूळ कारण आहे. यामुळे भगवान श्रीकृष्णाने या गोष्टींना नरकाचे द्वार म्हटले आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे 3 अवगुण असतात, तो नेहमी इतरांना दुःख देऊन आपला स्वार्थ साध्य करतो. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा असेल तर हे 3 अवगुण दूर करावेत. कारण जोपर्यंत हे अवगुण आपल्या मनात आहेत, तोपर्यंत आपले मन लक्ष्यापासून भटकत राहते.

गीतेमध्ये सांगण्यात आलेले इतर श्लोक आणि मॅनेजमेंट सूत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...