आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kon The Navrati Puja Information In 9 Days, Divya Marathi

जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा व उपाय करावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील शुक्ल प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीच्या उत्सव साजरा केला जातो. या वर्षी शारदीय नवरात्रीचा प्रारंभ 25 सप्टेंबर, गुरुवारपासून होत असून समापन 3 ऑक्टोबर शुक्रवारी होईल. धर्म ग्रंथानुसार नवरात्रीमध्ये प्रत्येक तिथीला देवीच्या एका विशेष रुपाची पूजा आणि एक खास उपाय केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. येथे जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी देवीच्या कोणत्या स्वरुपाची पूजा आणि उपाय करावा...

नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करावी. मार्कंडेय पुराणानुसार देवीचे नाव हिमालय राजाच्या येथे जन्म झाल्यामुळे पडले आहे. ही निसर्ग स्वरूपा देवी आहे. हिमालय आपल्या शक्ती, दृढता व स्थिरतेचे प्रतिक आहे. स्त्रियांनी या देवीची पूजा करणे श्रेष्ठ आणि मंगलकारी आहे. नवरात्रीच्या दिवशी योगी महात्मा आपली शक्ती मूलाधार केंद्रामध्ये स्थित करून योग साधना करतात.

उपाय - प्रतिपदा म्हणजे पहिल्या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवावा तसेच तूप दान करावे. या उपायाने आजार ठीक होतात आणि शरीर निरोगी राहते.

नवरात्रीमधील इतर दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)