आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishna And Duryodhan Was The Relative Know How To Become A Relationship

श्रीकृष्ण आणि दुर्योधन होते व्याही; जाणून घ्या, कसे जुळून आले हे नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुराण, वेद आणि उपनिषदमधील कथा वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर मनामध्ये काही प्रश्न अवश्य निर्माण होतात. काही प्रश्नांची उत्तरे मिळतात, परंतु काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात. आज आम्ही तुम्हाला या ग्रंथांमधील अशाच काही कथांविषयीची माहिती देत आहोत...

श्रीकृष्ण आणि दुर्योधन होते व्याही
श्रीमद्भागवतनुसार दुर्योधनाच्या मुलीचे नाव लक्ष्मणा होते. मुलगी लग्नाची झाल्यानंतर दुर्योधनाने तिच्या स्वयंवराचे आयोजन केले. त्या स्वयंवरामध्ये श्रीकृष्णाचा मुलगा सांब देखील आला होता. सांब लक्ष्मणाच्या सौंदर्यावर एवढा मोहित झाला की, त्याने तिचे हरण केले. कौरवांनी त्याचा पाठलाग करून त्याला बंदी बनवले. ही घटना श्रीकृष्णाला समजल्यानंतर त्यांनी कौरवांसोबत युद्ध करण्याची तयारी सुरु केली. परंतु भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम यांनी त्यांना थांबवले आणि ते स्वतः हस्तिनापुरला गेले.

हस्तिनापुरला गेल्यानंतर त्यांनी कौरवांना सांब आणि लक्ष्मणाला द्वारकेला पाठवण्याची विनंती केली. त्यानंतर कौरवांनी त्यांचा खूप अपमान केला. अपमानामुळे क्रोधीत झालेले बलराम आपल्या नांगराने हस्तिनापुरला गंगा नदीकडे ओढत घेऊन निघाले. कौरवांनी बलरामाचे ते रूप पाहून सांब आणि लक्ष्मणाला सोडून दिले आणि बलराम यांची क्षमा मागितली. त्यानंतर दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा आणि भगवान श्रीकृष्णचा मुलगा सांब यांचे लग्न झाले. अशाप्रकारे श्रीकृष्ण आणि दुर्योधन दोघेही व्याही झाले.

पुढील स्लाईड्सवर वाचा -
- रावणाने देवी सीतेला अशोक वाटिकेतच का ठेवले?
- श्रीकृष्णाने 16000 लग्न का केले?
- सुंदरकांडचे नाव सुंदरकांडच असे का ठेवण्यात आले?