आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishna Had Saved The Life Of Abhimanyu S In The Womb, Know How

जाणून घ्या, श्रीकृष्णाने कशाप्रकारे गर्भातच वाचवले होते अभिमन्यूच्या मुलाचे प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीमद्भागवत गीतेनुसार महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा अश्वथामाने झोपेत असलेल्या द्रौपदीच्या मुलांचा वध केला होता, त्यानंतर श्रीकृष्ण आणि पांडव अश्वथामाला दंडित करण्यासाठी त्याचा शोध सुरु केला. पांडवांचा विनाश करण्यासाठी अश्वथामाने ब्रह्मास्त्र सोडले होते परंतु श्रीकृष्णाच्या कृपेने पांडव जिवंत राहिले.

त्यानंतर अश्वथामाने पांडवांचा वंश नष्ट करण्यासाठी आपल्या ब्रह्मास्त्राची दिशा अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या गर्भाकडे केली. तेव्हा श्रीकृष्णाने पांडवांचा वंश नष्ट होऊ नये यासाठी सूक्ष्म रूप धारण करून उत्तराच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि ब्रह्मास्त्र शक्तीपासून गर्भातील बालकाचे रक्षण केले.

अशा प्रकारे श्रीकृष्णाने उत्तराच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याचे प्राण वाचवले. याच बालकाला पराक्रमी परीक्षित राजा म्हणून ओळखले जाते.