आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटांनी झाला लखपती भोलेनाथचा श्रृंगार, भक्तांनी अर्पण केले लाखो रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर (ब्यावर) : श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पद्धतीने पूजा केली जाते. सोमवारी ब्यावरमधील विविध मंदिरांमध्ये जलाभिषेकनंतर महादेवाचा विशेष श्रृंगार करण्यात आला. संध्याकाळच्या आरतीनंतर नोटांचा वापर करून करण्यात आलेला महादेवाचा श्रृंगार सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. भक्तांनी 1 हजार, 500 आणि 100 रुपयांच्या नोटा महादेवाला अर्पण केल्या होत्या. जवळपास 1 लाख रुपये महादेवाच्या श्रृंगारासाठी अर्पण करण्यात आले. या व्यतिरिक्त कृष्ण्गंज स्थित नांदेश्वर महादेव मंदिरात बर्फानी बाबाचे रूप भक्तांचे मन मोहून घेत होते. मध्यरात्री उशिरापर्यंत येथे महादेवाचा जयजयकार चालू होता. बर्फापासून तयार करण्यात आलेल्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बर्फानी बाबाचे मनमोहक रूप...