आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागचा राजा : पाहा 1934 पासून ते आतापर्यंतचे दुर्लभ फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शुक्रवारी 29 ऑगस्ट 2014 रोजी श्रीगणेश उपासनेचा दहा दिवसांचा गणेशोत्सव प्रारंभ होत आहे. या दहा दिवसांमध्ये घराघरात श्रीगणेश मूर्तीची स्थापना करून नियमित पूजा-अर्चना केली जाईल.

गणेशोत्सवाची सुरुवात बाळ गंगाधर टिळक यांनी केली. जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होता, त्या काळात सर्व भारतीयांना एकत्रित करण्यासाठी गणेशोत्सव सुरु करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करून सर्व भारतीय एकत्र जमा होऊन स्वातंत्र्य संग्रामाची चर्चा करत असत. सन् 1934 पासून प्रत्येक वर्षी मुंबईतील लालबाग भागामध्ये लालबाग राजाची विशाल मूर्ती स्थापन केली जाते. लालबागच्या राजाची ख्याती जगभरात पोहचली आहे.

लालबागचा राजा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो
असे मानले जाते की, येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा श्रीगणेश पूर्ण करतात. याच कारणामुळे लालबाग राजाच्या दर्शनासाठी भक्त तासंतास रांगेत उभे राहतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये येथे कोटी रुपयांचे दान भक्तांद्वारे अर्पण केले जाते. सामान्य जनतेपासून मोठ्या दिग्गज हस्ती लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे पोहचतात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा लालबागच्या राजाचे जुने आणि दुर्लभ फोटो...