आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमद्भागवत : कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणाची पूजा करावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मनुष्याच्या विविध इच्छा असतात. या इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्मांसोबतच देवी-देवतांची पूजा केली जाते. मनुष्य स्वतःच्या प्रत्येक दुःखात देवाचे अवश्य स्मरण करतो, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या देवी-देवतेची उपासना करणे आवश्यक आहे. भागवत ग्रंथामध्ये या विषयाचे संपूर्ण वर्णन करण्यात आले आहे.

1. ज्या लोकांना आपत्य प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी प्रजापतींची उपासना करावी.
2. धन हवे असेल तर मायादेवीची उपासना करावी.
3. तेज आणि शक्ती प्राप्तीसाठी अग्नीची उपासना करावी.
4. ज्याला अन्न प्राप्तीची इच्छा असेल त्याने देवी आदितीची उपासना करावी.
5. स्वर्ग प्राप्तीची इच्छा असणार्‍या व्यक्तीने देवी आदितीचे पुत्र सूर्यदेव, इंद्रदेव, वामन यांची पूजा करावी.