आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्म, ज्ञान, निर्वाण लाभले...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तथागत बुद्धाच्या जीवनात वैशाखी पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाक्य सम्राट शुद्धोदन राजाच्या घरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला. सिद्धार्थाला साधनेनंतर सम्यक संबोधी वैशाख पौर्णिमेला प्राप्त झाली, तर सम्यक संबुद्ध झालेल्या तथागताचे निर्वाणही वैशाखी पौर्णिमेलाच झाल्यामुळे या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेदेखील म्हटले जाते. यंदा 14 मे रोजी वैशाखी पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा असून, त्यानिमित्त....
शाक्य राजपुत्र सिद्धार्थ गौतमाने सत्याच्या शोधासाठी गृहत्याग केला. त्यावेळी उपलब्ध असलेल्या जवळपास सर्व प्रकारच्या साधना करूनही सिद्धार्थ गौतमाला वाटले की, सत्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याने शरीराला त्रास देण्याचा आणि आत्मक्लेषाचा मार्ग सोडून मध्यम मार्गाचा अवलंब केला. आजपासून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वैशाख शु. पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली आणि सम्यक संबुद्ध बनला.
चार आर्यसत्ये
तथागत बुद्धाने चार आर्यसत्ये सांगितली आहेत. ही आर्यसत्ये म्हणजे 1. जगात दु:ख आहे, 2. त्या दु:खाला कारण आहे, 3. हे कारण म्हणजे वासना होय आणि 4. वासना नियंत्रित करणे हा दु:ख समाप्त करण्याचा उपाय आहे.
तथागताने सांगितलेला धर्म (धम्म) लोकधर्म आहे. माणसाचे माणसाशी नाते सांगणारा आहे. सुखी होण्यासाठी प्रत्येक माणसाला पंचशील पाळण्याचा संदेश तथागत बुद्ध देतात. ही पाच शिले म्हणजे 1. मी शरीराने किंवा मनाने कोणत्याही जिवाला दुखवणार नाही. 2. मी चोरी करणार नाही. 3. मी खोटे बोलणार नाही. 4. मी मिथ्याचार करणार नाही आणि 5. मी अमली पदार्थ खाणार किंवा पिणार नाही. ही पाच शिले ऐकायला सोपी आणि साधी वाटत असली तरी त्याचे पालन करणे कठीण असते. मात्र, त्यापासून मिळणारा उच्च लाभ कल्याणकारी असतो.
पुढील स्लाइडमध्ये, बुद्धत्वापर्यंत पोहोचण्यापूर्वीच्या समाधी अवस्था