आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lord Ganesh, Know Worship Methods And Precaution

आज विजय मुहूर्तावर करा गणेश स्थापना, जाणून घ्या पूजन विधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार भाद्रपद मासातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीला श्रीगणेशाचा जन्म झाला होता. यामुळे या चतुर्थीला विनायक चतुर्थी, सिद्धिविनायक चतुर्थी आणि श्रीगणेश चतुर्थी नावाने ओळखले जाते. या वर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव 29 ऑगस्ट, शुक्रवारी आहे. ग्रंथानुसार या दिवशी स्नान, उपवास आणि दान केले जाते, याचे फळ श्रीगणेशाच्या कृपेने शंभरपट जास्त मिळते. व्रत केल्याने मनोवांच्छित फळ प्राप्त होते. आज आम्ही तुम्हाला श्रीगणेश पूजेचा विधी आणि शुभ मुहूर्त सांगत आहोत.

विधी
सकाळी लवकर उठून स्नान व नित्यकर्म झाल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार सोने, चांदी, तांब, पितळ किंवा मातीपासून तयार केलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. (शास्त्रामध्ये मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना श्रेष्ठ मानण्यात आली आहे) संकल्प मंत्रानंतर षोडशोपचार पूजा व आरती करावी. श्रीगणेशाच्या मूर्तीला शेंदूर, गुलाल लावावा. मंत्राचा उच्चार करीत 21 दुर्वा अर्पण कराव्यात. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. यामधील 5 मोदक मूर्तीसमोर ठेवावेत आणि 5 मोदक ब्राह्मणांना द्यावेत. उर्वरित मोदक प्रसाद म्हणून सर्वांना वाटावेत.
पूजेला सुरुवात करण्यापूर्वी खालील संकल्प मंत्राचा उच्चार करावा..
‘मम सकुटुंबस्य क्षेमस्थिती आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्धी, सर्वकाम निर्विघ्न सिद्धी, पुत्रपौत्र धनधान्य समृद्धीद्वारा प्रतिवार्षिक विहितम् श्री सिद्धिविनायक देवताप्रीत्यर्थ ध्यानावाहनादी षोडशोपचारै: पूजां करिष्ये।’
प्राणप्रतिष्ठा मंत्र :
रक्तांबोधिस्थपोतोल्लसदरुण सरोजधिरूढा कराब्जै:।
पाशाकोदंड भिक्षूद्रभवमथगुणप्यंकुशम् पंचबाणान्।।
बिभ्राणासृक्कपालं त्रिनयनलसिता पीतवक्षोरुहाढ्याम्।
देवी बालार्कवर्णा भवतु सुखकारी प्राणरुक्ति: परान:।।
पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊं गं गणपतये नम:

दुर्वा अर्पण करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊं गणाधिपतयै नम:
ऊं उमापुत्राय नम:
ऊं विघ्ननाशनाय नम:
ऊं विनायकाय नम:
ऊं ईशपुत्राय नम:
ऊं सर्वसिद्धप्रदाय नम:
ऊं एकदन्ताय नम:
ऊं इभवक्त्राय नम:
ऊं मूषकवाहनाय नम:
ऊं कुमारगुरवे नम:

शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)