आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार विशेष : श्रीगणेशाचा हा उपाय केल्यास घरात येते सुख-समृद्धी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म मान्यतेनुसार भगवान श्रीगणेश बुद्धीदाता व विघ्नहर्ता असण्यासोबतच सर्व भौतिक सुख-सुविधा आणि इच्छा पूर्ण करणारे देवता आहेत. यामुळे श्रीगणेशाला सुखकर्ता आणि दुःखहर्ता संबोधले जाते. बुधवार हा श्रीगणेश उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. घर-कुटुंबात सुख-समृद्धीसाठी आणि कलह दूर करण्यासाठी श्रीगणेश पूजेचे काही सोपे आणि अचूक उपाय शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, श्रीगणेश पूजेचा एक अचूक उपाय...

- सकाळी स्नान केल्यानंतर घरातच किंवा श्रीगणेश मंदिरात जाऊन गणपतीची पूजा करावी.

श्रीगणेशच्या पूजेसाठी गणपतीच्या मूर्ती व्यतिरिक्त समोर विड्याच्या पानावर अक्षतांचा वापर करून स्वस्तिक काढा. या पानावर लाल दोर्यात एक सुपारी गुंडाळून ठेवा. त्यानंतर या सुपारीची पंचोपचार पूजा करावी. गणपतीच्या या शुभ स्वरुपाची पूजा गंध, अक्षता, पुष्प, लाल वस्त्र अर्पण करून करावी. दुर्वा अर्पण करताना खालील मंत्राचा उच्चार अवश्य करावा.

दुर्वा करान्सह रितान मृतन्मंगल प्रदान।
आनी तांस्तव पूजार्थ गृहाण परमेश्वर।।
इतर पूजन सामग्री अर्पण करताना 'ॐ गं गणपतये नम:' किंवा श्री गणेशाय नम: या मंत्रांचा उच्चार करावा.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, संपूर्ण विधी...