आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळभैरवाष्टमी 14 नोव्हेंबरला: जाणून घ्या, महादेवाने का घेतला हा अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्यात 14 नोव्हेंबरला शुक्रवारी काळभैरव अष्टमी आहे. या दिवशी भगवान काळभैरवाची विशेष पूजा केली जाते. धर्म शास्त्रानुसार या दिवशी महादेवाने काळभैरव अवतार घेतला होता. येथे जाणून घ्या, महादेवाने काळभैरवाचा अवतार का घेतला...

शिवपुराणानुसार एकदा भगवान शंकराच्या माया शक्तीने प्रभावित होऊन ब्रह्म, विष्णू स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. या संदर्भात जेव्हा वेदांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी महादेवाला सर्वश्रेष्ठ आणि परमतत्त्व सांगितले. परंतु ब्रह्मा आणि विष्णू देवाने हे सत्य मान्य केले नाही. तेव्हा तेथून एक तेजपुंज पुरुषाकृती बाहेर पडली. ते दृश्य पाहून ब्रह्मदेव म्हणाले की, चंद्रशेखर तू माझा मुलगा आहेस. यामुळे तू मला शरण ये.

ब्रह्मदेवाचे हे शब्द ऐकून महादेव क्रोधीत झाले आणि ते त्या पुरुषाकृतीला म्हणाले की, काळाप्रमाणे शोभित असल्यामुळे तुम्ही साक्षात काळराज आहात. भीषण असल्यामुळे भैरव आहात. तुमच्यामुळे काळही भयभीत राहील, यामुळे तुम्ही काळभैरव आहात. मुक्तीपुरी काशीचे आधिपत्य तुम्हाला प्राप्त होईल. सर्व पाप कर्म करणार्यांचे तुम्ही शासक असाल. भगवान शंकराकडून हे सर्व वर प्राप्त करून काळभैरवाने आपल्या बोटाच्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे शिर धडावेगळे केले.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, काळभैरव अवतराकडून काय शिकावे...