आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज निघणार भगवान महाकाळची शाही पालखी, पाहा महाकाळचे खास श्रुंगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेश येथील उज्जैनमध्ये आज ( 25 ऑगस्ट, सोमवार) भगवान महाकाळ यांची शाही पालखी निघणार आहे. हा शाही पालखी सोहळा पाहण्यासाठी देश-परदेशातून श्रद्धाळू येतात आणि भगवान महाकाळचे दर्शन घेऊन धन्य होतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महाकाळची पालखी निघते परंतु आज श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी निघणाऱ्या पालखीचे विशेष महत्त्व आहे.

उज्जैनचे राजा आहेत भगवान महाकाळ
12 प्रमुख ज्योतिर्लिंगामध्ये महाकालेश्वरचा क्रम तिसरा आहे. प्रमुख ज्योतिर्लिंगामध्ये हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. यामुळे या ज्योतिर्लिंगाचे एक वेगळे महत्त्व आहे. उज्जैनचे लोक भगवान महाकाळ यांना आपला राजा मानतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान महाकाळ यांच्या प्रतीकात्मक मूर्तीची पालखीमध्ये स्थापना करून नगरातील विविध मार्गावरून मिरवणूक काढून पुन्हा मंदिरात आणली जाते.

येथील मान्यतेनुसार राजा महाकाळ पालखीत बसून प्रजेचा हालहवाल जाणून घेण्यासाठी नगरात भ्रमण करण्यासाठी निघतात. प्रजासुद्धा (नगरवासीय) आपल्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्यने उपस्थित असते. पालखी मार्गात विविध ठिकाणांवर राजा महाकाळच्या स्वागताची विशेष तयारी केली जाते. भगवान महाकाळ यांचा दररोज भक्तांचे मन मोहून घेणारा असा अद्भुत श्रुंगार केला जातो.
तुम्हालाही महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आकर्षक श्रुंगारांचे आणि शाही पालखीचे दर्शन घेण्याची इच्छा असेल तर पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...