आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माघी पोर्णिमा आज: असे करा व्रत व जाणून घ्या का खास आहे आजची तिथि

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आज 3 फेब्रवारी मंगळवार रोजी माघ मास पोर्णिमा आहे. धर्म ग्रंथांमध्ये यास माघी पोर्णिमा असे म्हटले गेले आहे. आजच्या दिवशी संयमाने राहणे, सकाळी स्नान करणे आणि उपवास करणे, दान करणे इत्यादी नियम बनवण्यात आले आहेत. या काळात शरीराची रोग प्रतिकारक क्षमता कमी होत असल्याने उपवास ठेवल्याने शरीर रोगग्रस्त होण्यापासून बचाव होतो. या दिवशी उपवास करण्याचा विधि खालील प्रमाणे आहे -
माघी पोर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून विष्णु देवतेची विधिवत पुजा केली पाहिजे. यानंतर पित्रांचे श्राद्ध करून गरजूंना भोजन, वस्त्र, तिळ, चादर , कापूस , गुळ, तुप , बुट , फळ, अन्न इत्यादीचे दान करावे. आजच्या दिवशी सोन्याचे आणि चांदीचे देखील दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी गौ दान केल्यास विशेष फल प्राप्ती होण्यास मदत होते.

आजच्या दिवशी संयमपूर्वक आचरण करून व्रत करण्याचा प्रयत्न करावा. आज कुणावर देखील जोरात बोलणे अथवा एखाद्या व्यक्तीवर राग व्यक्त केला नाही पाहिजे. तसेच गृह क्लेशापासून वाचले पाहिजे. गरीब आणि गरजूंची मदत केली पाहिजे. हे सर्व करत असताना एका गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे तुम्ही करत असलेल्या कार्यामुळे कुणाचाही अपमान होता कामा नये. अशा प्रकारे संयमपूर्वक व्रत केल्याने व्रत करणा-या व्यक्तीस पुण्य फल प्राप्ती होते.
माघी पोर्णिमेचे का आहे विशेष, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...