Home | Jeevan Mantra | Dharm | Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

महाशिवरात्री : शिवमहापुराणातील या 13 उपायांनी उजळेल भाग्य

धर्म डेस्क | Update - Feb 19, 2014, 03:12 PM IST

धर्म ग्रंथानुसार महादेवाची भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक उपासना केल्यास ते भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

 • Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

  धर्म ग्रंथानुसार महादेवाची भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक उपासना केल्यास ते भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या (२७ फेब्रुवारी, गुरुवार) निमित्ताने शिव भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. अशाच काही छोट्या आणि अचूक उपायांची माहिती शिवमहापुराणात सांगण्यात आली आहे.

  हे उपाय तुम्ही अगदी सहजरीत्या करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय केल्यास महादेवाची सदैव तुमच्यावर कृपा राहील.

  उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

  1. शरीरात ज्वर (ताप)  असल्यास महादेवाला जलाभिषेक केल्यास लवकर लाभ होतो. सुख आणि आपत्य वृद्धीसाठी जलाभिषेक करणे शुभ मानले जाते.

  2. शिवमहापुराणानुसार मधाने महादेवाला अभिषेक केल्यास टीबी रोग दूरू होतो.

 • Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

  3. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दुधाने महादेवाला अभिषेक करावा. सुगंधित तेलाने महादेवाला अभिषेक केल्यास समृद्धीमध्ये वृद्धी होते.

  4. महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते. महादेवाला गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यास मोक्ष प्राप्त होतो.

 • Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

  5. नपुंसक व्यक्तीने जर शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक केला आणि सोमवारचे व्रत केले तर त्याची समस्या दूर होईल.

  6. लाल आणि रूटीच्या फुलाने महादेवाची पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होतो.

 • Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

  7. चमेलीच्या फुलाने महादेवाची पूजा केली तर वाहन सुख मिळते. जवसाच्या फुलाने महादेवाची पूजा केल्यास मनुष्य भगवान विष्णूला प्रिय होतो.

  8. शमीच्या पानांनी महादेवाची पूजा केल्यास मोक्ष प्राप्त होतो. पारिजातकाच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास गुणवान पत्नी मिळते.

 • Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

  9. जुईच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास घरात धान्याची कमतरता भासत नाही. दुर्वाने पूजा केल्यास आयुष्य वाढते.

  10. कन्हेरीच्या फुलाने महादेवाची पूजा केल्यास नवीन वस्त्र मिळतात.

 • Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

  11. धोत्र्याच्या फुलाने महादेवाची पूजा केल्यास सुयोग्य मुलाची प्राप्ती होते. लाल देठ असलेले धोत्र्याचे फुल शुभ मानले जाते.

  12. महादेवाला तांदूळ अर्पण केल्यास धनाची प्राप्ती होते. तीळ अर्पण केल्यास पापांचा नाश होतो.

 • Maha Shivaratri Shivmahapuran S 13 Measures

  13. महादेवाला जवस अर्पण केल्यास सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्यास आपत्य वृद्धी होते.
  देवाला अर्पण केलेले हे सर्व अन्न पदार्थ नंतर गरिबांना दान करावेत.

Trending