Home | Jeevan Mantra | Dharm | Mahabharat Series On Jeevan Mantra

असे झाले होते द्रौपदीचे वस्त्रहरण, त्यानंतर झाला होता मोठा अपशकून

धर्म डेस्क | Update - Jan 13, 2014, 02:50 PM IST

महाभारत सिरीज दोनमध्ये आतापर्यंत तुम्ही वाचले की, धर्मराज युधिष्ठीरने श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार राजसूय यज्ञ करण्याचा विचार केला

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  महाभारत सिरीज दोनमध्ये आतापर्यंत तुम्ही वाचले की, धर्मराज युधिष्ठीरने श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार राजसूय यज्ञ करण्याचा विचार केला. यासाठी भीम, अर्जुन, नकुल व सहदेव यांनी वेगवेगळ्या दिशांना जाऊन तेथील राजांचा पराभव करून स्वताचे एकछत्र राज्य स्थापन केले. धर्मराज युधिष्ठिरच्या यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णाची आग्र पूजा (सर्वात पहिले श्रीकृष्णाची पूजा) पाहून शिशुपालने अपशब्दांचा वापर केला. शिशुपालचे शंभर अपराध पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचा वध केला.

  महाभारत सिरीजच्या तिसर्‍या भागामध्ये वाचा दुर्योधन आणि शकुनीने कशाप्रकारे धूर्तपणे द्यूत क्रीडेमध्ये (जुगार) युधिष्ठिरची संपत्ती जिंकून घेतली. त्यानंतर युधिष्ठिरने द्रौपदीला पणाला (दावावर)लावले आणि दुःशासनाने भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले. त्यानंतर धृतराष्ट्राच्या यज्ञशाळेत एक अपशकून घडला, जो पाहून सर्वजण घाबरले होते. त्यानंतर धृतराष्ट्रने पुन्हा एकदा पांडवांना जुगार खेळण्यासाठी तयार केले आणि या कारणामुळे पांडवांना वनवासात जावे लागले.

  महाभारताशी संबंधित आणखी काही रोचक आणि गुप्त गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  1- राजसूय यज्ञ पूर्ण झाल्यानंतर सर राजे-महाराज आपापल्या राज्याकडे निघून गेले. त्यानंतर महर्षी वेदव्यास आपल्या शिष्यांसोबत धर्मराज युधिष्ठिरकडे गेले. युधिष्ठिराने त्या सर्वांचा आदर-सत्कार केला. महर्षी वेदव्यासांनी युधिष्ठिर राजाचे कौतुकही केले. तेव्हा युधिष्ठिरने महर्षी वेदव्यास यांना विचारले की, देवर्षी नारद यांनी मला महविनशाचा एक संकेत दिला होता. शिशुपालच्या वधाने तो महाविनाश समाप्त झाला का? अजूनही काही शिल्लक आहे.  

  युधिष्ठिरचे शब्द ऐकून महर्षी वेदव्यास म्हणाले की - वर्तमानात जो घटनाक्रम चालू आहे त्याचा परिणाम तेरा वर्षांनंतर दिसून येईल. त्यावेळी दुर्योधनाच्या अपराधामुळे सर्व क्षत्रिय एकत्र होऊन भीम आणि अर्जुनाच्या हातून समाप्त होतील. एवढे बोलून महर्षी वेदव्यास निघून गेले. वेदव्यासांचे शब्द ऐकून ध्रम्रज युधिष्ठिरला खूप दुःख झाले.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  2. राजसूय यज्ञ समाप्त झाल्यानंतर सर्व राजे निघून गेले परंतु दुर्योधन आणि शकुनी हे दोघे काही दिवस तेथेच थांबले. युधिष्ठिरचे वैभव, ऐश्वर्य, राजसभा पाहून दुर्योधनाच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला. दुर्योधन आणि शकुनी परत हस्तिनापुरकडे निघाल्यानंतर शकुनीने दुर्योधनाला एक योजना सांगितली की, युधिष्ठिराला जुगार खेळण्याची खूप हौस आहे परंतु त्याला चांगल्याप्रकारे खेळता येत नाही.

  जर युधिष्ठिराला जुगार खेळण्यासाठी तयार केले तर मी त्याचे राज्य आणि वैभव आपल्याकडे घेऊ शकतो. अशाप्रकारे युधिष्ठिराचा संपूर्ण राजपाठ तुझ्याकडे येईल. दुर्योधनाला मामा शकुनीची ही योजना आवडली आणि त्याने शकुनीला सांगितले की, यासंबंधी मी महाराज धृतराष्ट्र यांच्याकडे चर्चा करेल.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  3. हस्तिनापूरला परत आल्यानंतर शकुनीने महाराज धृतराष्ट्र यांना सांगितले की, तुमचा मुलगा दुर्योधन दिवसेंदिवस दुर्बल होत चालला आहे, त्याला एखाद्या घोर चिंतेने ग्रासले असावे असे मला वाटते. हे ऐकून धृतराष्ट्रने दुर्योधनाला बोलावून घेतले आणि चिंतेचे कारण विचारले. तेव्हा दुर्योधनाने युधिष्ठिराच्या वैभव आणि ऐश्वर्यासंबंधी महाराज धृतराष्ट्र यांना सांगितले. तेवढ्यात शकुनीने धृतराष्ट्र यांना सांगितले की, महाराज मी युधिष्ठिरकडून त्याचे राज्य जिंकून घेऊ शकतो, फक्त तुम्ही त्यांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रण द्या.

  शकुनीचे बोलणे ऐकल्यानंतर धृतराष्ट्र यांनी यासंबधी विदुराशी चर्चा केली. विदुर यांना शकुनीचा पूर्ण डाव समाजाला त्यांनी जुगार हा खेळ फार वाईट असल्याचे सांगितले. यामुळे तुमचे मुलं आणि पुतण्यांमध्ये वैर निर्माण होईल असे सांगितले. यामुळे कौरव आणि पांडवांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  4. महाराज धृतराष्ट्रने विदुराने सांगितलेल्या गोष्टी दुर्योधनाला समजावून सांगितल्या, परंतु दुर्योधन काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तेव्हा महाराज म्हणाले की, तू पांडवांचा द्वेष करू नको. तुला त्यांच्या संपत्तीची काय गरज आहे. तुझी इच्छा असेल तर तुझ्यासाठीही  राजसूय महायज्ञ करू. एवढे सांगूनही तरीही दुर्योधन तयार झाला नाही.

  दुर्योधन म्हणाला की, मला पांडवांची संपत्ती हवी नाही तर मी मृत्यूचे वरण(प्राणत्याग) करेल. हे ऐकून महाराजांनी युधिष्ठिरला जुगार खेळण्यासाठी आमंत्रित करण्याची गोष्ट स्वीकार केली. सेवकांना तोरण स्फटिक नावाच्या सभेचे निर्माण करण्यास सांगितले. त्या सभेला एक हजार खांब आणि शंबर दरवाजे होते.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  5. सभा तयार झाल्यानंतर महाराज धृतराष्ट्र यांनी मुख्यमंत्री विदुर यांना बोलावून घेतले आणि त्यांना इंद्रप्रस्थ येथे जाउन युधिष्टिरला जुगार खेळण्यासाठी आमंत्रण द्या असे सांगिलते. विदुराने याचा विरोध केला परंतु महाराजांनी त्याचे ऐकून घेतले नाही. महाराजाच्या आज्ञेचे पालन करत विदुर इंद्रप्रस्थला पोहचले. विदुराने धर्मराज युधिष्ठीर यांना सर्व खरा घटनाक्रम सांगितला. युधिष्ठिर म्हणाले की, जुगार हा खेळ अधर्माचे मूळ आहे परंतु महाराज धृतराष्ट्र यांच्या आज्ञेचे पालन करणे हा माझा धर्म आहे. आम्ही सर्व भाऊ जुगार खेळण्यासाठी हस्तिनापूरला अवश्य येऊ.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  6. धर्मराज युधिष्ठिरसोबत सर्व भाऊ, द्रोपदी आणि इतर राण्या हस्तिनापुरला पोहचले. दुसर्या दिवशी सर्वजण सभेच्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर युधिष्ठिरने विचारले की, येथे उपस्थित लोकांमधील मला कोणासोबत खेळावे लागेल आणि कोण डाव लावेल. दुर्योधन म्हणाला की, डाव लावण्यासाठी धन आणि रत्न मी देईल परंतु माझ्याबाजूने मामा शकुनी खेळतील. अशाप्रकारे खेळाला सुरुवात झाली.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  7. पहिले युधिष्ठिरने एक सुंदर हार डावावर लावला, तो डाव शकुनीने जिंकला. त्यानंतर युधिष्ठिर प्रत्येक डाव हरत गेला. युधिष्ठिरला वारंवार हरताना पाहून विदुराला शकुनीची कुटनीती लक्षात आली आणि त्यांनी सभेमध्ये याला विरोध केला परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. युधिष्टिर आपले संपूर्ण ऐश्वर्य, वैभव जुगारात हरले.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  8. त्यानंतर युधिष्टिरने क्रमशः नकुल, सहदेव, अर्जुन आणि भीम यांना डावावर लावले. शकुनीने ते सर्व डाव जिंकले. त्यानंतर युधिष्ठिरने स्वतःला डावावर लावले आणि तो डावही शकुनीने जिंकला. महाराज धृतराष्ट्र यांनी समजून घेतले की, दुर्योधनाची इच्छा पूर्ण झाली. हा विचार करून ते खूप आनंदी झाले. ते वारंवार विचारात होते की, आपण जिंकलो का? सर्वात शेवटी युधिष्ठिरने द्रौपदीला डावावर लावले. हे पाहून तेथील सर्व उपस्थित लोकानी युधिष्ठिर राजाचा धिक्कार केला. शकुनीने तो डावही जिंकून घेतला.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  9. द्रौपदीला जिंकल्यानंतर दुर्योधनाने महात्मा विदुर यांना बोलावले आणि पांडवांची सुदर पत्नी द्रौपदीला घेऊन येण्यास सांगितले. विदुर यांनी हे काम करण्यास नकार दिला. तेव्हा दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीला घेऊन येण्याची आज्ञा दिली. आपल्या भावाच्या आज्ञेने दुःशासन द्रौपदीचे केस पकडून ओढत तिला सभेमध्ये घेऊन आला. हे पाहून पांडवांना खूप दुःख झाले.

  10. द्रौपदीला अशा अवस्थेत पाहून दुर्योधनाचा छोटा भाऊ विकर्णने याचा विरोध केला परंतु कर्णाने त्याला आडवले आणि दुःशासनाला द्रौपदी आणि पांडवांचे सर्व वस्त्र काढण्यास सांगिलते. कर्णाचे हे शब्द ऐकताच पांडवांनी आपल्या शरीरावरील वस्त्र काढून टाकले. दुःशासन बळजबरीने द्रौपदीचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न करू लागला.
  तेव्हा द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. द्रौपदीची कळकळीची हाक ऐकून श्रीकृष्ण सूक्ष्म स्वरुपात तेथे आले आणि त्यांनी द्रौपदीला सुंदर वस्त्रांनी सुरक्षित केले.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  11- दु:शासनला द्रौपदीचे वस्त्र ओढताना पाहून भीम क्रोधीत झाला आणि त्याने भर सभेत प्रतिज्ञा केला की, युद्धभूमीमध्ये ही या दु:शासनाची छाती फाडून त्याचे गरम रक्त प्राशन करेल. भीमाची प्रतिज्ञा ऐकून सर्वजण घाबरले. तोपर्यंत  दु:शासन द्रौपदीचे वस्त्र ओढता-ओढता थकून गेला होता.

  सभेमध्ये वस्त्रांचा ढेर लागला आणि दुःशासन शरमेने मान खाली घालून बसला. हे पाहून दुर्योधन आपल्या डाव्या मांडीवर थाप मारू लागला. भीमाचे डोळे रागाने लाल झाले आणि तो दुर्योधनाला म्हणाला की, जर युद्धामध्ये मी तुझी मांडी फाडली नाही तर मला सद्गती प्राप्त होऊ नये. हे शब्द बोलून भीमने सभेमध्ये भय उत्पन्न केला.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  12. जेव्हा हा पूर्ण घटनाक्रम चालू होता तेव्हा धृतराष्ट्र यांच्या यज्ञशाळेमध्ये खूप गिधाड जमा झाले, गाढवं रडू लागले आणि पक्षिगण मोठमोठ्या आवाजात ओरडू लागले. हा आवाज ऐकून गांधारी घाबरली. विदुर आणि गांधारीने ही सर्व घटना महाराज धृतराष्ट्र यांच्यापर्यंत पोहचवली. काही काळाने धृतराष्ट्र द्रौपदीला म्हणाले की, तू परम पतिव्रता आहेस, तुझी जी काही इच्छा असेल ती मला सांग.
  द्रौपदीने धृतराष्ट्राकडे सम्राट युधिष्ठिराचे आणि भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचेही दासत्व मुक्त करावे असा वर मागितला.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  13. त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर महाराज धृतराष्ट्रकडे गेला आणि विचारले, आता आम्ही काय करावे? महाराजांनी सांगितले की, तू तुझे संपूर्ण धन परत घे आणि तुझ्या राज्याचे पालन कर. माझ्या मुलांना माफ कर. तू माझ्याकडे आणि माता गांधारीकडे पाहून दुर्योधनाचा वाईट खेळ विसरून जा. त्यानंतर सर्व पांडव इंद्रप्रस्थकडे जाण्यासाठी निघाले.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  14. जेव्हा दुर्योधनाला ही गोष्ट समजली तेव्हा तो खूप क्रोधीत झाला आणि आपल्या वडिलांना महाराज धृतराष्ट्र यांना जाऊन म्हणाला की, आपण आता पांडवांशी वैर स्वीकारले आहे आणि आता ते आपल्याला क्षमा करणार नाहीत. यामुळे आपण वनवासाच्या अटीवर त्यांच्यासोबत जुगार खेळू. यामध्ये जो हरेल त्याला १२ वर्ष वनामध्ये आणि तेराव्या वर्षी अज्ञातवासात राहावे लागेल. जर अज्ञातवास भंग झाला तर पुन्हा १२ वर्ष वनवास करावा लागेल. धृतराष्ट्राने दुर्योधनाची गोष्ट मान्य केली. पांडव अजून रस्त्यामध्येच होते. महाराजांची आज्ञा मानून युधिष्ठिर पुन्हा जुगार खेळण्यासाठी तयार झाला.

 • Mahabharat Series On Jeevan Mantra

  15. वनवासाची पूर्ण अट ऐकून घेतल्यानंतर युधिष्ठिर पुन्हा एकदा शकुनीसोबत जुगार खेळण्यासाठी बसला आणि तो डावही हरला. त्यानंतर पांडव वनवासात जाण्यासाठी निघाले, तेवढ्यात विदुर युधिष्ठिरला म्हणाले की, माता कुंती आता वृद्ध झाल्या असून त्यांना हा वनवास सहन होणार नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या घरी वास्तव्य करावे. धर्मराज युधिष्ठिरने विदुराची विनंती मान्य केली आणि माता कुंती, पितामाह भीष्म, गुरु द्रौणाचार्य, कुलगुरु कृपाचार्य व महाराज धृतराष्ट्र यांची आज्ञा घेऊन वनवासाला निघाले.

Trending