आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahabharata Is An Epic Narrative Of The Kaurava And The Pandava Princes

असा झाला होता गांधारीच्या 100 मुलांचा जन्म, ही आहेत त्यांची नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतानुसार, राजा धृतराष्ट्र यांना 100 पुत्र होते, हे सर्वांनाच माहिती आहे परंतु त्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांची नावे काय होती हे फार कमी लोकांना माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला याविषयीची खास माहिती देत आहोत.

असा झाला कौरवांचा जन्म
एकदा महर्षी वेदव्यास हस्तिनापुरला आले होते. त्यावेळी गांधारीने त्यांची खूप सेवा केली. प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला शंभर पुत्र होण्याचे वरदान दिले. काही काळाने गांधारी गरोदर राहिली आणि दोन वर्ष गर्भ पोटातच राहिला. यामुळे गांधारी घाबरली आणि तिने गर्भ पाडला. तिच्या पोटातून मांस पिंड बाहेर पडले. महर्षी वेदव्यास यांनी योगदृष्टीने हे पाहिले आणि ते लगेच गांधारीकडे आले. त्यांनी गांधारीला त्या मांस पिंडावर पाणी शिंपडण्यास सांगितले. पाणी टाकताच त्या पिंडाचे 101 तुकडे झाले. त्यानंतर व्यास ऋषींनी गांधारीला ते मांस तुकडे तुपाने भरलेल्या वेगवेगळ्या हंड्यामध्ये ठेवून ते दोन वर्षांनंतर उघडण्यास सांगितले. दोन वर्षांनंतर त्याच हंड्यातून पहिले दुर्योधन आणि नंतर गांधारीच्या 99 मुलांचा जन्म झाला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गांधारीच्या 100 मुलांची नावे...