Home | Jeevan Mantra | Dharm | Mahamantra In Crisis For Solve Problems

संकटकाळात हा छोटासा महामंत्र चुटकीसरशी दूर करेल प्रत्येक अडचण

धर्म डेस्क | Update - Nov 21, 2013, 05:02 PM IST

भगवान राम आणि श्याम म्हणजे श्रीकृष्ण हे दोन परमेश्वराचे असे अवतार आहेत की, ज्यांचे जीवन चरित्र पवित्रता, प्रेम, स्नेह, कर्म, मर्यादा, शक्ती, बुद्धी, ज्ञान, विवेक, समर्पण, त्याग यासारख्या असंख्य गुण आणि शक्तींनी भरलेले आहे.

 • Mahamantra In Crisis For Solve Problems

  भगवान राम आणि श्याम म्हणजे श्रीकृष्ण हे दोन परमेश्वराचे असे अवतार आहेत की, ज्यांचे जीवन चरित्र पवित्रता, प्रेम, स्नेह, कर्म, मर्यादा, शक्ती, बुद्धी, ज्ञान, विवेक, समर्पण, त्याग यासारख्या असंख्य गुण आणि शक्तींनी भरलेले आहे. यांच्या माध्यमातून मनुष्य जीवनाला सुख, शांती आणि यशस्वी जीवन जगण्याची शिकवण मिळते. यामुळे श्रीराम आणि श्रीकृष्णाचे केवळ नामस्मरण केल्याने मनुष्याचे जीवन सुखी होऊ शकते.

  प्रत्येक मनुष्याला आयुष्यात धनासोबतच मनाची शांती आवश्यक आहे. सुख प्राप्त करण्यासाठी आणि संकटापासून दूर राहण्यासाठी श्रीराम आणि श्रीकृष्णाचे सामुहिक स्मरण करण्यासाठी धर्मग्रंथामध्ये एक सोपा प्रभावी मंत्र सांगण्यात आला आहे.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या संकटमोचक मंत्र आणि त्याचे शुभ प्रभाव...

 • Mahamantra In Crisis For Solve Problems

  धार्मिक दृष्टीकोनातून राम-कृष्णाचा हा मंत्र कलियुगातील पापनाशक मंत्र मानला गेला आहे. या महामंत्राचे स्मरण केल्यास सर्व दोषातून मुक्ती मिळते. पितृ, देव, मनुष्य दोष किंवा अधर्माचा अंत होऊन सुख-संपन्नता प्राप्त होते.
  याच कारणामुळे कोणत्याही संकटकाळी, दिवस असो किंवा रात्र या मंत्राचे स्मरण केल्यास व्यक्ती सुखी आणि धनी बनतो तसेच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

  पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, महामंत्र....

 • Mahamantra In Crisis For Solve Problems

  या मंत्राचे स्मरण करण्यापूर्वी श्रीराम आणि श्रीकृष्णाची चंदन, फुल, धूप-दीप, नैवेद्य दाखवून पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा श्रद्धापूर्वक जप करावा...
  मंत्र :
  हरे राम हरे राम, राम राम हरे हरे।
  हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे।।

Trending