आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांचे धार्मिक महत्त्व आणि पाहा खास PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. जीवनातील दुःख, अडचणी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आजच्या दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपसना केली जाते.

प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी, देवतांनी, असुरांनी देवांचे देव महादेवाची तपश्चर्या करून विविध वरदान प्राप्त केले आहेत. श्रावणात भारतातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होते. या बारा ज्योतिर्लिंगामधील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व आणि मंत्र शक्तीची माहिती देत आहोत.

शास्त्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचा क्रम असा सांगण्यात आला आहे...
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥

यामधील महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग खालीलप्रमाणे आहेत.

१. परळी वैजनाथ
२. भीमाशंकर
३. त्र्यंबकेश्वर
४. औंढा नागनाथ
५. घृष्णेश्वर

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या ज्योतिर्लिंगांची संपूर्ण माहिती...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)