आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव कुटुंब : दोन पुत्रच नाही तर महादेवाला एक पुत्रीसुद्धा आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेव एका अर्थाने संपूर्ण कुटुंबाचे देवता आहेत, कारण हे एकमेव असे देवता आहेत ज्यांचे कुटुंब पूर्ण आहे. महादेवाचे पुत्र कार्तिकेय आणि श्रीगणेश यांच्याविषयी सर्वांनाच माहिती आहे. परंतु यांना एक मुलगीसुद्धा आहे याची माहिती फार कमी लोकांना असावी. महाशिवरात्री (7 मार्च, सोमवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देत आहोत.

भगवान शिव
महादेवाला सृष्टीचा प्राण मानले जाते. जर शिव नसते तर सृष्टी शव समान झाली असती. याच कारणामुळे महादेवाला काळांचा काळ म्हणजेच महाकाल मानले जाते. शिव प्राण देतात, जीवन देतात आणि संहारही करतात. महादेवाची पूजा सर्व सुख प्रदान करणारी मानली गेली आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये सहजपणे प्रसन्न होणाऱ्या देवतेची उपाधी महादेवाकडे आहे.

ही आहे भगवान महादेव आणि देवी पार्वती यांची मुलगी
महादेवाच्या मुलीचे नाव अशोक सुंदरी आहे. पौराणिक कथा आणि काही लोक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने आपला एकटेपणा दूर करण्यासाठी कल्पवृक्ष (सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे झाड)कडे कन्या प्राप्तीचे वरदान मागितले. या फलस्वरुपात अशोक सुंदरीला जन्म झाला. अशोक सुंदरीचे लग्न परमपराक्रमी राजा नहुषसोबत झाला. देवी पार्वतीच्या वरदानाने अशोक सुंदरीने ययातीसारखा वीर पुत्राला आणि शंभर रूपवती मुलींना जन्म दिला.
महादेवाच्या कुटुंबातील इतर सदस्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...