(दिव्य मराठी प्रतिनिधी : वैभव किरगत, सुकृत करंदीकर, रमेश धाबे, कमलाकर अकोलकर, निलेश जोशी)
हिंदू धर्मामध्ये
महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. जीवनातील दुःख, अडचणी, पाप, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आजच्या दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली जाते. प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी, देवतांनी, असुरांनी देवांचे देव महादेवाची तपश्चर्या करुन वरदान प्राप्त केले आहेत.
भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. तुम्हालाही आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती प्राप्त करण्याची इच्छा असेल तर या महिन्याच्या पहिल्या दिवशी घरबसल्या घ्या महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन.
भीमाशंकरभीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम दिसून येते. मंदिर परिसरात शनि मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो
. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती आणि पौराणिक कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून घ्या, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
दर्शनाचा आणि उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या भस्मारतीच लाभ...