आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : उज्जैनचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वरची भस्म आरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाच्या पूजेमध्ये भस्म अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. बारा ज्योतिर्लिंगामधील एक उज्जैन स्थित महाकालेश्वर मंदिरात दररोज विशेष भस्म आरती केली जाते. ही एक प्राचीन प्रथा आहे. येथे शिवपुराणानुसार जाणून घ्या, शिवलिंगावर भस्म अर्पण करण्याशी संबंधित खास माहिती...

असे आहे महादेवाचे रूप -
भगवान शिव अविनाशी आहेत. महादेव जेवढे साधे सरळ तेवढेच रहस्यमयी आहेत. भोलेनाथाचे राहणीमान, आवास, गण इ. सर्व देवतांपेक्षा एकदम वेगळे आहे. शास्त्रामध्ये सर्व देवतांचे सुंदर वस्त्र आणि दागिन्यांनी सुसज्जित असे वर्णन आढळते तर महादेवाचे रूप वेगळेच सांगण्यात आले आहे. महादेव नेहमी मृगचर्म (हरणाच्या कातडीचे आसन) धारण केलेले आणि शरीरवत भस्म (राख) लावलेले असतात.

भस्म आहे सृष्टीचा सार
महादेवाचे प्रमुख वस्त्र भस्म म्हणजे राख आहे. कारण त्यांचे पूर्ण शारिरी भस्माने झाकलेले असते. शिवपुराणानुसार भस्म सृष्टीचा सार असून एक दिवस ही संपूर्ण सृष्टी राख स्वरुपात परिवर्तित होईल. असे मानले जाते की चारही युग (त्रेतायुग, सतयुग, द्वापारयुग आणि कलियुग) नंतर सृष्टीचा विनाश होतो आणि पुन्हा सृष्टीची रचना ब्रह्मदेव करतात. ही क्रिया अविरत चालू राहते. त्यामुळे महादेव हाच सृष्टीचा सार भस्म म्हणजे राख शरीरावर लावतात. याचाच अर्थ एक दिवस ही संपूर्ण सृष्टी महादेवामध्ये विलीन होणार आहे.

कसे तयार होते भस्म
शिवपुराणानुसार भस्म तयार करण्यासाठी कपिल गायीचे शेन, शमी, पिंपळ, पलाश, वड आणि बोराच्या झाडाची लाकडे एकत्रितपणे जाळली जातात. या दरम्यान योग्य मंत्राचा उच्चार केला जातो. या सर्व वस्तू जाळल्यानंतर भस्म प्राप्त होते. अशाप्रकारे तयार करण्यात आलेले भस्म महादेवाला अर्पण केले जाते.

भस्माने प्राप्त होतो मान-सन्मान
अशाप्रकारे तयार करण्यात आलेले भस्म एखाद्या व्यक्तीने शरीरावर लावल्यास त्याला सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. व्यक्तीचे आकर्षण वाढते आणि समाजात मन-सन्मान प्राप्त होतो. यामुळे महादेवाला अर्पण केलेल्या भस्माचा टिळा अवश्य लावावा.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भस्माची विशेषता आणि पाहा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचे खास फोटो....