आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्री आज : अशाप्रकारे करा पूजा, जाणून घ्या संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (24 फेब्रुवारी, शुक्रवार) महाशिवरात्री आहे. शिवपुराणानुसार या दिवशी महादेवाची विधिव्रत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते. महाशिवरात्रीला अशाप्रकारे करा महादेवाची पूजा. (या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांच्या पूजा आणि आरतीचा लाभ घ्या divyamarathi.com वर.)

व्रत विधी
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र झाल्यानंतर कपाळावर भस्माचा त्रिपुंड टिळा लावावा आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. त्यानंतर मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करवी. व्रत संकल्प घेताना खालील मंत्राचा उच्चार करावा -

शिवरात्रिव्रतं ह्येतत् करिष्येहं महाफलम्।
निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते।।

त्यानंतर हातामध्ये फुल, अक्षता घेऊन शिवलिंगावर अर्पित करताना खालील मंत्राचा उच्चार करावा....

देवदेव महादेव नीलकण्ठ नमोस्तु ते।
कर्तुमिच्छाम्यहं देव शिवरात्रिव्रतं तव।।
तव प्रसादाद्देवेश निर्विघ्नेन भवेदिति।
कामाद्या: शत्रवो मां वै पीडां कुर्वन्तु नैव हि।।

अशाप्रकारे महादेवाची रात्री करा पूजा
दिवभर शिव मंत्र (ऊं नम: शिवाय)चा जप करून निराहार उपवास करावा (रोगी, अशक्त आणि वृद्ध दिवस फलाहार) करू शकतात. शिवपुराणामध्ये रात्रीच्या चार प्रहरात शिव पूजा करण्याचे विधान आहे. संध्याकाळी स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावे आणि खालील मंत्राचा उच्चार करून संकल्प घ्यावा.

ममाखिलपापक्षयपूर्वकसलाभीष्टसिद्धये शिवप्रीत्यर्थं च शिवपूजनमहं करिष्ये

महादेवाला फळ, फूल, चंदन, बिल्वपत्र, धोतरा अर्पण करून, धूप-दीप लावून रात्री चारही प्रहर पूजा करावी. जल आणि पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा. भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महान, भीम आणि ईशान या नावांचा उच्चार करून फुल अर्पण करावे. त्यानंतर आरती करावी. खालील मंत्राचा उच्चार करून प्रार्थना करावी -
 
नियमो यो महादेव कृतश्चैव त्वदाज्ञया।
विसृत्यते मया स्वामिन् व्रतं जातमनुत्तमम्।।
व्रतेनानेन देवेश यथाशक्तिकृतेन च।
संतुष्टो भव शर्वाद्य कृपां कुरु ममोपरि।।

दुसऱ्या दिवशी (25 फेब्रुवारी, शनिवार) सकाळी पुन्हा स्नान करून महादेवाची पूजा करून व्रत सोडावे.

रात्रीच्या पूजेचे शुभ मुहूर्त...
पहिल्या प्रहरातील पूजा - संध्याकळी 06:18 ते 09:20 पर्यंत
दुसऱ्या प्रहरातील पूजा- रात्री 09:20 ते 12:40 पर्यंत
तिसऱ्या प्रहरातील पूजा - रात्री 12:40 ते 03:45 पर्यंत
चौथ्या प्रहरातील पूजा - रात्री 03:45 ते सकाळी 06:53 पर्यंत

महाशिवरात्रीची कथा, आरती आणि इतरही रोचक गोष्टी वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...