आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामाने केली होती या शिवलिंगाची स्थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (24 फेब्रुवारी, शुक्रवार) महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मामध्ये हा दिवस महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत खास मानला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने  आज आम्ही तुम्हाला रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची माहिती देत आहोत.

अशी झाली रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची स्थापना
लंकापती रावण एक ब्राह्मण होता आणि रावणाच्या वधामुळे श्रीरामाला ब्रह्म हत्येचे पाप लागले होते. ऋषीमुनींनी श्रीरामाला ब्रह्म हत्येच्या पापाचे प्रायश्चित करण्यास सांगितले. श्रीरामाने हनुमानाला कैलास पर्वतावर जाऊन महादेवाची मूर्ती आणण्यास सांगितले. कैलास पर्वतावर गेल्यानंतर हनुमानाला महावाची कोणतीच मूर्ती दिसली नाही. त्यानंतर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान तपश्चर्या करू लागले. तपश्चर्येला बसल्यामुळे हनुमान श्रीरामाकडे लवकर पोहचू शकले नाहीत. खूप वेळ वाट पाहूनही हनुमान महादेवाची मूर्ती घेऊन आले नाहीत. त्यानंतर ऋषीमुनींनी श्रीरामाला देवी सीतेने तयार केलेल्या वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून पूजा करण्यास सांगितले. हेच शिवलिंग पुढे रामेश्वरम नावाने प्रसिद्ध झाले.

या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...