Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana

माहिष्मतीमध्ये कधीकाळी होता 1000 हातांचा राजा, रावणाला केले होते कैद

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 31, 2017, 09:39 AM IST

'बाहुबली 2 : द कन्क्लुजन'मध्ये ज्या माहिष्मती नगराचा उल्लेख करण्यात आला आहे, असेच एक नगर इतिहासात कधीकाळी मध्यप्रदेशात होते.

 • Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana
  'बाहुबली 2 : द कन्क्लुजन'मध्ये ज्या माहिष्मती नगराचा उल्लेख करण्यात आला आहे, असेच एक नगर इतिहासात कधीकाळी मध्यप्रदेशात होते. इंदूर शहरापासून 100 किलोमीटरवर महेश्वर नावाचे असलेले नगर कधीकाळी माहिष्मती नावाने ओळखले जात होते. दिव्यमराठी.कॉम तुम्हाला सांगत आहे, त्या नगरात राहणाऱ्या राजाविषयी ज्याचे 1000 हात होते आणि त्याने रावणाला कैद केले होते.

  कोण होते सहस्त्रार्जुन
  - प्राचीन काळी माहिष्मती नगरात (आजचे महेश्वर) राजा सहस्त्रार्जुनचे शासन होते. सहस्त्रार्जुन क्षत्रियांच्या हैहय वंशाचा राजा कार्तिवीर्य आणि राणी कौशकी यांचे सुपुत्र होते. यांचे खरे नाव अर्जुन होते.
  - त्यांनी दत्तात्रय देवाची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले होते.
  - अर्जुनाने दत्तात्रयाकडे 1 हजार हातांचे वरदान मागितले. तेव्हापासून त्यांचे नाव सहस्त्रार्जुन, सहस्त्रबाहू पडले.

  एक हजार हातानी अडवला होता नर्मदेचा प्रवाह
  - महाराज सहस्त्रबाहू यांनी दशानन रावणालाही आपल्या मुठीत कैद केले होते.
  - वाल्मिकी रामायणानुसार, राक्षसांचा राजा रावणाने जवळपास सर्व राजांना पराभूत केले होते. राजा सहस्त्रबाहूचे नाव ऐकल्यानंतर रावणाने त्यांची पराभूत करण्याचा निश्चय केला.
  - रावण युद्धासाठी माहिष्मती नगरात पोहोचला. त्यावेळी राजा सहस्त्रबाहू आपल्या पत्नींसोबत नर्मदा नदीमध्ये जलविहार करत होते.
  - रावणाला सहस्त्रबाहू नगरात नसल्याचे समजले, परंतु युद्ध करण्याच्या इच्छेने रावण तेथेच थांबला.
  - नर्मदा नदीचा प्रवाह पाहून रावणाला महादेवाची पूजा करण्याची इच्छा निर्माण झाली. ज्याठिकाणी रावण महादेवाची पूजा करण्यासाठी थांबला होते तेथे जवळच सहस्त्रबाहू अर्जुन पत्नींसोबत जलक्रिडेत मग्न होता. सहस्त्रबाहूने आपल्या एकहजार हातांनी नर्मदेचा प्रवाह रोखला, त्यामुळे पाणी एका ठिकाणी अडले.

  आजोबांनी रावणाला केले मुक्त
  - ज्याठिकाणी रावण महादेवाची पूजा करत होता, ते ठिकाणही नर्मदेच्या पाण्याने बुडून गेले. अचानक नर्मदा नदीला आलेल्या पुराचे कारण जाणून घेण्यासाठी रावणाने सैनिकांना पाठवले.
  - सहस्त्रबाहूने अचानक नर्मदेचे अडवलेले पाणी सोडले, ज्यामुळे रावणाचे पूर्ण सैन्य वाहून गेले. त्यानंतर रावणाने सहस्त्रबाहूसोबत युद्ध केले.
  - नर्मदा नदीच्या काठावरच रावण आणि सहस्त्रबाहूमध्ये भयंकर युद्ध झाले. शेवटी सहस्त्रबाहूने रावणाला कैद केले.
  - ही गोष्ट रावणाचे आजोबा पुलत्स्य ऋषींना समजली तेव्हा त्यांनी सहस्त्रबाहूकडे आपल्या नातवाला सोडून देण्याची विनंती केली.
  - महाराज सहस्त्रबाहू यांनी ऋषींच्या विनंतीचा सन्मान करत रावणावर विजय प्राप्तकरूनही त्याला मुक्त केले.

  नोट : इतिहासकारांमध्ये या संदर्भात काही मतभेद असू शकतात.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, या पौराणिक शहराचे काही निवडक फोटो...

 • Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana
  नर्मदा नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर शहर महेश्वर.
 • Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana
  अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वर नगराला राजधानीचा मान दिला होता. 
 • Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana
  महेश्वर सुती आणि रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
 • Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana
  महेश्वर येथे या ठिकाणाला सहस्त्रधारा नावाने ओळखले जाते.
 • Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana
  महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला सुंदर होळकर फोर्ट
 • Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana
  महेश्वर येथे अनेक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.
 • Mahishmati King Sahastrabahu Imprison Ravana
  माहिष्मती दुर्ग

Trending