आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे बालाजीचा दरबार, आरती सुरु होताच नाचू लागतात \'भूत-प्रेत\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपुर - भारतामध्ये हनुमानाची लाखो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी असते, परंतु राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील मेहंदीपूर बालाजीचे महत्त्व खूप खास आहे. मेहंदीपूर बालाजीला दुष्ट आत्म्यांपासून मुक्ती मिळवून देण्यार्‍या दिव्य शक्तीने प्रेरित हनुमानाचे शक्तिशाली मंदिर मानले जाते. येथे अनेक लोकांना साखळदंडात बांधलेले आणि उलटे लटकलेले पहिले जाऊ शकते. हे मंदिर आणि याच्याशी संबंधित चमत्कार पाहून कोणीही आचंबित झाल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळी बालाजीची आरती सुरु होताच भूतप्रेताने पिडीत लोक नाचू लागतात.

साखळदंडात बांधून आणले जाते पीडितांना
असे मानले जाते की, हजारो वर्षांपूर्वी हनुमान आणि प्रेत राजा अरावली पर्वतावर प्रकट झाले होते. वाईट आत्मा आणि काळ्या जादूपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक येथे येतात. या मंदिराला अशा त्रासंमधून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग मानले जाते. मंदिरातील पंडित अशा समस्यांना दूर करण्यासाठी विविध उपाय करतात. शनिवार आणि मंगळवारी येथे येणार्‍या भक्तांची संख्या लाखोच्या घरात असते. अनेक गंभीर रुग्णांना लोखंडाच्या साखळदंडात बांधून मंदिरात आणले जाते. येथे येणार्‍या पिडीत लोकांना पाहून सामान्य लोकांचा आत्माही थरथर कापू लागतो. हे लोक मंदिराच्या बाहेर बसून मोठ-मोठ्याने ओरडत स्वतःमधील वाईट आत्म्याविषयी सांगतात. हे लोक औषध न घेता तंत्र-मंत्राच्या जोरावर स्वस्थ होऊन परत जातात.

पुढील स्लाईडवर वाचा, किती वर्ष जुने आहे मंदिर....कोण आहे प्रेतराज सरकर आणि कोतवाल कप्तान...