आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही ठिकाणी पोंगल तर काही ठिकाणी बिहूच्या रुपात साजरी केली जाते मकर संक्रांती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात एक सण विविध पध्दतींने साजरा केला जातो. मकर संक्रांती हा एक तसाच सण आहे. तामिळनाडूमध्ये मकर संक्रांती हा सण पोंगलच्या रुपात साजरा केला जातो. तेथे या सनाला माद्दू पोंगल म्हटले जाते. हे सण कृषी सबंधीत असतो.

पोंगल
जानेवारीपर्यंत तामिळनाडुतील मुख्य पीक ऊस आणि धान्य हे तयार होतात. शेतातील भरभराट पाहून देवाला आभार व्यक्त करण्यासाठी पोंगल हा सण साजरा केला जातो. पोंगल या सणामध्ये मुख्यतः बौलाची पूजा केली जाते कारण बैलाच्या माध्यमातून शेतकरी हा शेती करत असतो. गाय आणि अन्य पशूंना यावेळी सजवले जाते. त्यांच्या शिंगांवर कलाकृती काढल्या जातात. यानंतर देवाला नवीन पीकांचा नैवेद्य दाखवला जातो. गाय आणि बैलांना ऊस आणि तांदूळ खायला दिले जातात. या निमित्ताने बैलाची शर्यत आणि इतर खेळांचे आयोजन केले जाते. पोंगलच्या तिस-या दिवशी बहिणी आपल्या भावासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणीला उपहार देतात.

आसाममध्ये मकर संक्रांती कोणत्या पध्दतीने साजरी केली जाते हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...